Breaking News

महत्वाच्या बातम्या

शेलू येथे मास्क घालून बाळाचे बारसे

कर्जत : बातमीदारकोरोनाचा विषाणू संसर्गाने पसरत आहे. शहराच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी आहे, पण तरीही सावधगिरी बाळगत शेलू येथे नवजात बाळाचे मास्क घालून बारसे करण्यात आले.चीनमधून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. या विषाणूवर अजूनही लस व औषधोपचार उपलब्ध नसल्याने संसर्ग टाळणे आणि खबरदारी घेणे …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद आणि खुला

पनवेल, मुंबई : प्रतिनिधीनागरिक व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी सोमवारी (दि. 23) सकाळी अचानकपणे बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला.अत्यावश्यक काम असेल तरच …

Read More »

तुर्भे नाका येथे 22 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

पनवेल : बातमीदार ओरिसा येथून तुर्भे नाका येथे गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दुकलीला अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने सापळा लावून अटक केली. चिन्मय विभुती सहाणी (24) व दीप गिरीश भानुशाली (21) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडे असलेला पाच लाख 33 हजार रुपये किमतीचा सुमारे 22 किलो …

Read More »

‘वर्क फ्रॉम होम’मुळे इंटरनेटच्या वापरात दुपटीने वाढ

पनवेल : बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरी काम करण्याची मुभा (वर्क फ्रॉम होम) दिली आहे. त्यामुळे देशात इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला आहे. सर्वसाधारणपणे एखादा ग्राहक दिवसाला एक किंवा दोन गिगाबाइटचा वापर करीत असतो, मात्र आता हा वापर पाच ते सहा गिगाबाइट इतका झाला आहे. डोंगल वापरासाठीही …

Read More »

रसायनी परिसरात मास्कचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी सम्यक सामाजिक संस्था, रसायनी आणि जनविकास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी पाताळगंगा परिसरात शेकडो मास्कचे वाटप करण्यात आले. शिवाय आजाराविषयी पत्रके वाटून जनजागृतीही करण्यात आली. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड आणि जनविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ कुरंगले यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी …

Read More »

उरण पोलीस ठाण्याकडून नागरिकांना विशेष सूचना

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे.त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी उरण पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवार (दि. 23) पासून आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.  1) सकाळी 6  ते  9  मच्छी मार्केट व डेअरी दुकान, 2) …

Read More »

असंख्य गाड्यांमुळे एक्स्प्रेस वे झाला ठप्प

शासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत प्रवासी रस्त्यावर पनवेल : प्रतिनिधी कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला असताना लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन राज्य …

Read More »

उद्यापासून देशांतर्गत विमानसेवाही होणार बंद

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमान सेवादेखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी (दि. 23) घेतला. या निर्णयानुसार 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी …

Read More »

माथेरानमध्ये रेशनिंगसाठी नागरिकांची लगबग

कर्जत : बातमीदार : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे.त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, पण सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर एकाच गर्दी केली. या वेळी पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य …

Read More »

अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी मुरूड पोलिसांकडून थाळी व घंटानाद

मुरूड : प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना 24 तास सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्स व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत असून त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत व त्यांना कामात उत्तेजना व प्रेरणा मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण मुरूड शहरात थाळी …

Read More »