Breaking News

महत्वाच्या बातम्या

सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्या दलाल, अधिकार्यांवर कारवाई करा

अलिबाग : प्रतिनिधी इंटीग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिपसाठी प्रस्तावित असणार्‍या दिव (ता. रोहा) गावातील गट नं. 133 या सरकारी खाजण जमिनीला खोत दाखवून त्या जमिनी कुळांच्या नावे करून दलाल आणि गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही महसूल अधिकार्‍यांनी केला. या जमिनी हडप करण्याच्या कटात सामील असलेल्या दलाल व शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी …

Read More »

हेदवली शाळेत पर्यावरण स्नेहहंडी

कर्जत : बातमीदार  पारंपरिक सण अतिशय उत्साहात विविध संस्कारक्षम उपक्रमांनी साजरे केले जाणे हे कर्जत तालुक्यातील हेदवली शाळेचे वैशिष्ट्य आहे. शनिवारी गोपाळकालाही शाळेत असाच उत्साहात साजरा झाला. शाळेतील दहीहंडीला स्नेहहंडी असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. विद्यार्थ्यांत परस्पर स्नेहाचे वातावरण वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आली. शालेय परिसरात …

Read More »

महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये दहीहंडी साजरी

महाड : प्रतिनिधी महाड आणि पोलादपुर तालुक्यांमध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात आली. सार्वजनिक दहीहंडीप्रमाणे खाजगी दहीहंड्या देखील बांधण्यात येतात. शहरांमध्ये शिवसेना पुरस्कृत सर्वात उंच हडी बांधण्यांत आली असुन शिवाजी चौक मित्र मंडळाने दखील दहीहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकांना आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. या वर्षी पुरामुळे अनेकांचे …

Read More »

रायगडात दहीहंडीचा थरार

पायरीची वाडी शाळेतील बालगोपाळांनी साजरी केली ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ पाली, बेणसे : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील राजिप शाळा पायरीची वाडीच्या बालगोपळांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आळस, अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धेची हंडी फोडत अनोख्या पद्धतीने ‘प्रबोधनात्मक दहीहंडी’ उत्सव साजरा केला. भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांना विषेश महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकून …

Read More »

आज उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

अरुणास्त! माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जेटली यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी (दि. 24) निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. एम्स रुग्णालयात दुपारी 12च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेटली आजारी होते. श्वसनाचा त्रास …

Read More »

लोकसंख्यावाढ : राजकीय फोडणी नको

पंतप्रधानांनी लोकसंख्यावाढीबाबत नुकतीच चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या दोन-चार दिवसांत हा विषय माध्यमांत चर्चेला आहे, मात्र त्याचवेळी या चर्चेचा सूर भलत्याच दिशेने भरकटत असल्याचेही जाणवत आहे. आपल्याकडे ही फार मोठी समस्या आहे. आकलन मर्यादित असेल, तर विषयाला हात न घालण्याचा पर्याय खुला असतो, मात्र ते पथ्य पाळले जात नाही. …

Read More »

कृष्णप्पाचा काला; एकाच सामन्यात आठ विकेट्स आणि 39 चेंडूंत शतक

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमियर लीग 2019मध्ये धम्माल उडवून दिली आहे. शुक्रवारी (दि. 23) झालेल्या सामन्यात त्याने एकाच सामन्यात आठ विकेट्स घेताना 39 चेंडूंत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. बेल्लारी टस्कर्सकडून शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळताना कृष्णप्पा गौतमने ही कमाल केली आहे. कृष्णप्पा गौतमची …

Read More »

डब्ल्यूबीटी : सिंधूची फायनलमध्ये धडक

नवी दिल्ली ः भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी (दि. 24) इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंधूने धडक मारली आहे. या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यू फेईवर 21-7, 21-14 अशी मात करीत सहज विजय मिळवला.

Read More »

विंडीजविरुद्ध कसोटीत ईशांत, जडेजा चमकले

गयाना : वृत्तसंस्था ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसर्‍या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने आठ गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात विंडीजचा संघ अद्याप 108 धावांनी पिछाडीवर आहे. दुसर्‍या दिवशी जडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत सन्माजनक धावसंख्या उभारून दिल्यानंतर ईशांत शर्माने पाच बळी …

Read More »