Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी स्वराज्य स्पोर्ट्स, जय हनुमान, राजमाता जिजाऊ, शिवशक्ती यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत महिला विभागात विजयी सलामी दिली. डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सला मात्र आज संमिश्र यश लाभले. न्यू इंडिया इन्श्युरन्स, देना बँक, महिंद्रा, मुंबई बंदर, युनियन …

Read More »

वडाळे तलाव, पुतळे सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील वडाळे तलाव, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामांना स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (दि. 1) मंजुरी देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेत विकासकामे सुरू असल्याचे स्थायी …

Read More »

पनवेल मनपातर्फे आज विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 2) सायंकाळी 4 वाजता रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, …

Read More »

आसू आणि हसू!

शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार नाशिक : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेले स्क्वॉर्डन लीडर निनाद मांडवगणे (वय 33) यांच्यावर शुक्रवारी (दि. 1) नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी तुफान गर्दी केली होती. भारतमाता …

Read More »

शाश्वत फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस

पनवेल : रामप्रहर वृत्त 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.शाश्वत फाऊंडेशनतर्फे अ‍ॅड. सेन्टर सायन्स अ‍ॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून खारघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत ‘हसत खेळत विज्ञान शिका’ ह्या संकल्पनेतून विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 21व्या शतकात राष्ट्रीय पातळीवर भारताने गरूडझेप घेतली असून त्यात आपल्या …

Read More »

सिडकोच्या उलवे अग्निशमन केंद्राच्या संपर्क क्रमांकांमध्ये बदल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या उलवे नोड येथील अग्निशमन केंद्राचे 9029003201 व 9029003202 हे संपर्क क्रमांक तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात येत असून त्याऐवजी 8657461125 आणि 8657461126 हे नवीन मोबाईल क्रमांक तेथील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी सिडको उलवे नोडमधील नागरिकांनी आणीबाणीच्या काळात उपरोक्त नवीन क्रमांकांवर संपर्क साधावा, …

Read More »

पनवेल येथे रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील कोएसोच्या इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत नुकताच रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिडेंट व्ही. सी. म्हात्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. जय भांडारकर, अ‍ॅड. अमोल पालकर, मुख्याध्यापिका अंजली उर्‍हेकर, मनीषा मॅडम, पर्यवेक्षिका मानसी कोकील, प्रकाश पाटील, किसन पवार, राजेंद्र सोनावणे …

Read More »

कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त दैनिक पुण्यनगरीच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सन्मान सोहळा 2019चे आयोजन शुक्रवारी (दि. 1) करण्यात आले होते. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव, ती सर्वस्वी समाजाचा उत्कर्ष आणि सई जल्लोष गु्रप डान्स रंगला. सोहळ्याला लेखिका विजया वाड आणि पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मतदार नोंदणी झाली नाही अशा सर्व नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून शनिवारी (दि 2) व रविवारी (दि. 3) या दिवशी नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेबाबत आज …

Read More »

सामाजिक कार्य हेच खरे राजकारण -महाजन

पनवेल : प्रतिनिधी सामाजिक कार्य हेच खरे राजकारण, निवडणुकीपुरते भांडा, नंतर विकास साधा, असे लोकसभा सभापती सुमित्राताई महाजन यांनी नुकतेच धुळे येथे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  प्रसंगी बोलताना सांगितले. आदर्श शैक्षणिक समूहाचे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार 24 फेब्रुवारी रोजी …

Read More »