Breaking News

महत्वाच्या बातम्या

राज्य बेंच प्रेस स्पर्धेत अक्षय शनमुगम स्ट्राँगमन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान इंदापूर (पुणे) येथे बेंच प्रेस स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर अशा विविध गटाच्या ई क्विप आणि अनई क्विप स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सीनिअर 74 किलो वजनी गटात रायगडच्या अक्षय शनमुगमयाने सुवर्ण पदक प्राप्त करून सीनिअर …

Read More »

रेवदंड्यातील कुस्ती स्पर्धेत आंदोशी आखाडा प्रथम

रेवदंडा : प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा आयोजित कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. 24) उत्साहात झाला. स्पर्धेत आंदोशी आखाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर वाडगाव द्वितीय व मांडवाने तृतीय क्रमांक पटकावला. रंगतदार कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्ती प्रेमी मंडळीने केली होती. प्रतिवर्षी लक्ष्मीपुजनाचे निमित्ताने रेवदंडा हायस्कूलच्या पटागंणात …

Read More »

भाजपच्या वतीने पेणकरांना सूरमयी भेट

पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण शहराच्या वतीने मंगळवारी (दि. 25) दिवाळी सणानिमित्त सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक संतोष पाटील व त्याचे सहकारी जगदीश पाटील, विद्या जोशी-शिवलिंग, अश्विनी म्हात्रे यांच्या सुश्राव्य गीतांनी या कार्यक्रमात रंगत आणली. पेणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. विकासकामे यापुढेही सुरूच राहणार …

Read More »

चॉकलेट्समध्ये आढळल्या आळ्या

साजगाव ग्रामपंचायतीची दुकानावर कारवाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त वाटप केलेल्या मिठाईमध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली असून, जेथून ही मिठाई खरेदी करण्यात आली, त्या खारघर येथील ड्रायफ्रुट्सच्या दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी साजगांव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केली आहे. दिवाळीत फराळ आणि मिठाईला मोठी मागणी असते. दिवाळीच्या …

Read More »

पेण-पाबळ विभागातील कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

दिवाळीनंतर पक्ष वाढवण्याचे काम जोमाने करणार  -आमदार महेंद्र दळवी पेण : प्रतिनिधी  पाबळ विभागातील शेकाप तसेच उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दिवाळी मुहूर्तावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) पक्षात प्रवेश केला. दिवाळीनंतर बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचे काम जोमाने करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले. …

Read More »

पनवेलच्या करंजाडेत शेकापला धक्का

माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला करंजाडेमध्ये मोठा धक्का बसला आहे. शेकापचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

राजे शिवराय प्रतिष्ठानचा दुर्गदर्शन सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या दुर्गदर्शन सोहळ्याचे उद्घाटन रविवारी (दि. 23) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष …

Read More »

सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये ‘दिवाळी पहाट’ सजली; हजारो श्रोत्यांची उपस्थिती

पनवेल (हरेश साठे) दीपावलीची पहाट, त्यातच थंडीचा गारवा आणि त्यामध्ये सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये दिवाळीची पहाट सजली होती. निमित्त होते ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त …

Read More »

जांभिवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता कोंडीलकर

मान्यवरांकडून अभिनंदन! पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीकडून वेदीका विनोद जाईलकर …

Read More »

विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन

धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन  भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणार्‍या …

Read More »