म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील देहेन आणि म्हसळा येथील पर्जन्यमापक यंत्रे सदोष व तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्याने पावसाची नोंद प्रकारे होत नाही. त्यामुळे नियोजन चुकत असल्याचे म्हसळा तालुक्यातील शेतकर्यांचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन व विकास परिषदेकडून नाविन्यपुर्ण बाब म्हणून मंडळ निहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याचा निर्णय 2013 साली झाला. त्यानुसार म्हसळा …
Read More »द्रुतगती मार्गावर दोन अपघात
आपत्कालीन यंत्रणा कर्मचारी, पोलिसांसह प्रवासी जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुणे लेनवर रविवारी (दि. 4) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले. किमी 28 जवळ खाजगी प्रवासी बस उलटून पहिला अपघात घडला. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जखमी झाल, तर दुसरा अपघात किमी 27/800 येथे घडला. त्यात …
Read More »मुरूडमध्ये विधवा महिलांना मिळणार सन्मानाची वागणूक
कुणबी समाजाचा पुढाकार; एकमताने ठराव मंजूर मुरूड ः प्रतिनिधी कुणबी समाजोन्नती संघ मुरूड जंजिरा विभागातील नांदले, चिंचघर, उसडी-चाफेगाव, जमृतखार, सावली, मिठागर या गावांतील समाज बांधवांची सालाबादप्रमाणे गौरी गणपती सण व 75व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त सभा नुकतीच झाली. विधवा प्रथा बंद करून अशा महिलांना सनान्माची वागणूक देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात …
Read More »पुढच्या वर्षी लवकर या!
गौरी गणपतीला भक्तगणांकडून भावपूर्ण निरोप अलिबाग ः प्रतिनिधी लाडक्या गणेशाची पाच दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर रायगडकरांनी सोमवारी (दि. 5) त्याला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गणपतींसोबत गौरींचेही वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जनस्थळी निघाल्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी …
Read More »धोकेबाज उद्धव ठाकरेंना जागा दाखवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. मोदी-फडणवीसांच्या नावाने मते मागून जिंकून आल्यानंतर विश्वासघात केला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी 2014मध्ये युती मोडली. उद्धव ठाकरेंना आता जागा दाखवण्याची वेळ आली …
Read More »खोपोलीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले गणरायाचे दर्शन
खोपोली ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 4) खोपोलीत विविध भागात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. नगरपालिका हद्दीतील लवजी या ठिकाणी पाटील कुटूंबियांच्या सार्वजनिक श्री गणरायाचे दर्शन आमदारांनी घेतले, त्यावेळी त्यांचे …
Read More »‘सीकेटी’च्या स्वस्तिकाची वर्ल्ड टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन् शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चीन येथे होणार्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा …
Read More »कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक सत्कार, नेत्र तपासणी शिबिर
-आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस रविवारी (दि. 4) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कामोठे सेक्टर 6 येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, दंत व नेत्र तपासणी शिबिराचे …
Read More »भाले ग्रामस्थांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील भाले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) सायंकाळी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. माणगाव शासकीय विश्रामगृहात रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात भाले गावचे ज्येष्ठ नेते भागाराम मंचेकर, पंढरीनाथ उतेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत मंचेकर, विनोद ढवळे, महेश महाडिक, राकेश महाडिक, संजय …
Read More »रायगडात ठिक ठिकाणी गौरी पूजन उत्साहात
कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन कर्जत : प्रतिनिधी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper