उरण ः रामप्रहर वृत्त – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणार्या सह्याद्रि प्रतिष्ठान उरण तालुक्याच्या वतीने उरण तालुक्यातील उरणचे वैभव असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहिमेअंतर्गत साफसफाई करून विविध वृक्षे लावण्यात आली. सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात चालू …
Read More »उरणमधील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा
जसखार, रांजणपाडा, मुळेखंड, सोनारी, करळ गावात घुसले पाणी उरण ः वार्ताहर – गेल्या सहा दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाचा जोर वाढत असून पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे. उरणमध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उरण तालुक्यात नव्याने येत असलेल्या प्रकल्पांच्या …
Read More »मच्छीमारांच्या समस्या मार्गी लावण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
उरण ः रामप्रहर वृत्त – जेएनपीटी चौथे बंदरबाधित ओएनजीसी पाईप लाईन प्रकल्पबाधीत मच्छीमारांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जेएनपीटी चौथे बंदर व ओएनजीसीची पाईप लाईन प्रकल्पबाधित मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत …
Read More »रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी पार पडला. 2005 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी जयदास यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तब्बल 14 वर्षांनी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या …
Read More »मनपात स्वतंत्र प्रभाग कार्यालये
सिडकोकडून चार ठिकाणी भूखंडांची खरेदी पनवेल ः बातमीदार – प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी पनवेल महापालिकेने तयारी सुरू केली असून, स्वतंत्र प्रभाग कार्यालये उभारण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांची भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सध्या पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेली कार्यालये स्वतंत्र ठिकाणी असणार आहेत. 110 चौरस किलोमीटरच्या पनवेल महापालिका क्षेत्रात …
Read More »‘मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024’चा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दिपांकर्स बॅडमिंटन अॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित मिशन ऑलिम्पिक गोल्ड 2024 या अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. 30) करण्यात आला. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात होणार 15 हजार रोपांची लागवड
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वन विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 1) पिसार्वे येथे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख …
Read More »अपहृत चार अल्पवयीन मुलींचा शोध; दोन तरुण ताब्यात
पनवेल ः बातमीदार नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्या दोन तरुणांनादेखील ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुलामुलींचा …
Read More »मालधक्का झोपडपट्टीतील नाल्यांची सफाई; नगरसेविका वृषाली वाघमारे यांचा पुढाकार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमधील मालधक्का झोपडपट्टीतील घरात सलग तीन दिवस पाणी शिरले. काही घरात दोन फुटापेक्षा जास्त पाणी होते. सोमवारी (दि. 1) नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी महापालिकेतर्फे जेसीबी आणून नाला साफ करून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवीन पनवेलमध्ये सिडकोचे अधीक्षक अभियंता फुलारे यांच्यासोबत पाहणी करून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. पनवेल …
Read More »सीईटीपीचे पाणी कासाडी नदीत; आरोग्य धोक्यात
पनवेल ः वार्ताहर गेले दोन दिवस म्हणजे 48 तास सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे तळोजा एमआयडीसीमधील सीईटीपी सतत 48 पडणार्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरून बाहेर वाहू लागली आहे. त्यामुळे टँकमधील पाणी थेट रस्त्यावरील चेंबरमधून सरळ कासाडी नदीच्या पात्रात जात आहे. सीईटीपीच्या टँककमधील पाणी थेट कासाडी नदीत पोचल्याने माशांना धोका पोचणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper