Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल, उरणमध्ये वृक्ष लागवड ; वृक्ष लावा व संवर्धन करा -सायली म्हात्रे

उरण ः वातार्हर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, असे  संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे सर्वांनी वृक्ष लावले पाहिजेत, फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, त्या वृक्षांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज कृषी दिनानिमित्त आपण सर्वांनी झाडे लावू या व त्यांचे संवर्धन करू या, असे प्रतिपादन उरण पालिकेच्या नगराध्यक्षा …

Read More »

पांडवकडा धबधबा फेसाळला; पर्यटकांची गर्दी

पनवेल ः बातमीदार जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली खरी, परंतु आनंदसरींची प्रतीक्षा कायम होती. अखेर शेवटच्या आठवड्यात जोरदार सरी कोसळू लागल्या आणि अवघा निसर्ग बहरून आला. याच निसर्गाचा भरभरून आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलेही अशा पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार-रविवारी पनवेल परिसरातील धबधबे, धरणांवर पर्यटकांनी गर्दी केली. पनवेल तालुक्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा …

Read More »

धानसर येथे गटारे बांधण्याची मागणी

पनवेल : बातमीदार महापालिका हद्दीतील धानसर गावात पावसाळी गटारे बांधण्याची मागणी राजेश तांबोळी यांनी पनवेल महापालिकेकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने धानसार गावातील गटारे बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे. पावसाळ्याचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने नागरिकांना यातून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे. धानसार गावातील जिल्हा परिषद शाळा ते …

Read More »

कामोठे विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत यश

कामोठे ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयातील इयत्ता पाचवीमधील स्नेह उदय लुगडे व इयत्ता आठवीमधील विठ्ठल दिनकर पालवे, तसेच एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीमधील विठ्ठल दिनकर पालवे, उंडे भूषण मारुती, कांबळे आदित्य सुनील हे पाच विद्यार्थी …

Read More »

रोटरी क्लबतर्फे मुलींसाठी स्वच्छतागृह

कामोठे ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीज-टाऊन पनवेल व रोटरी क्लब ऑफ कामोठे-पनवेल यांच्यामार्फत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे यांच्या वतीने रोटरी क्लबकडे मुलींच्या स्वच्छतागृहाची मागणी केली असता रोटरी क्लब ऑफ कामोठे पनवेलचे अध्यक्ष डॉ. शशिकांत म्हात्रे यांनी लगेच या …

Read More »

अर्धे उरण अंधारात ; वीज मंडळाचा सावळा गोंधळ ‘उजेडात’

उरण ः रामप्रहर वृत्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उरण वीज मंडळाचा सावळा गोंधळ उघड झाला असून काल (दि. 30) मध्यरात्रीपासून वीज गायब झाली आहे. सकाळपासून अनेक वेळा तक्रार करूनही दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी या संदर्भात बैठक होऊनही वीज मंडळाचा कारभार सुधारताना दिसत नसल्याने जनतेत …

Read More »

पर्यटकांना खुणावतेय गाढेश्वर धरण

पनवेल : बातमीदार – पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित  होतात, मात्र मद्याच्या नशेत पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमावल्याच्या घटना दरवर्षी येथे घडत आहेत. त्यामुळे या वर्षी …

Read More »

रोटरी क्लब आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचा उपक्रम कौतुकास्पद -संजय कुमार

पनवेल : वार्ताहर – पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात येत असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आयोजित …

Read More »

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -डॉ. हेमलता वैशंपायन

उरण : वार्ताहर – निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून योगामुळे ताणताणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत. त्यामुळे आपले शरीर निरोगी होतेच त्याचप्रमाणे एकाग्रता वाढते. आहार व नियमित योगा हे महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक लाभ होतो. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या आहारात लक्ष ठेवले …

Read More »

विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी

पनवेल : प्रतिनिधी – कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड आणि तळोजा येथील रफ बटालियनचे असिस्टंट कमांडंट सुधीर सोनवणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. शनिवारी (दि. 29) कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ  …

Read More »