खारघर ः प्रतिनिधी सिडकोतर्फे सुरू करण्यात आलेली सार्वजनिक सायकल योजना पर्यावरणपूरक तर आहेच, परंतु सायकलच्या वापरास चालना मिळाल्याने व्यायामासाठी सहज-सोपे साधन उपलब्ध होऊन नागरिकांना निरोगी आयुष्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आ. ठाकूर व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते व …
Read More »‘स्वच्छ भारत’मध्ये कामगारांचा मोठा वाटा -पाटील
पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई कर्मचार्यांचे …
Read More »उरण येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात
उरण : वार्ताहर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत राबविण्यात आली. उरण शहरात 13 ठिकाणी पल्स पोलिओ बुथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत या केंद्रावर उरण येथे बालकांना पोलिओ …
Read More »काळुंद्रे पूल वाहतुकीस खुला ; ओएनजीसीजवळील वाहतूक कोंडी सुटणार
खारघर : प्रतिनिधी सायन पनवेल महामार्गावरील काळुंद्रे येथील नव्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. या ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरूनच दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत होत्या. मागील वर्षभरापासून या ठिकाणची वाहतूक कोंडी ही प्रवाशांना मनस्ताप ठरत होती. शुक्रवारी नवीन पूल वाहतुकीस सुरू …
Read More »लोधिवलीतील अंबानी हॉस्पिटलसाठी ग्रामसभेत ठराव
रसायनी : प्रतिनिधी लोधिवली येथिल धिरूभाई अंबानी हास्पिटल बंद न करता सुरळीत चालू राहण्यासाठी लोधिवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात सर्व नागरिक एकत्र येऊन ग्रामपंचायतीमार्फत धिरुभाई अंबानी हास्पिटल बंद होऊ नये, असा ठराव बहुमताने पास करून घेतला. कै. धिरुभाई अंबानी यांनी लोधिवली येथील शेतकर्यांच्या जमिनी खरेदी …
Read More »तन्वी गावंड हिचे संगणक विज्ञान अभियांत्रिकी शाखेत सुयश
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने घेतलेल्या परीक्षेचे अभियांत्रिकी शाखेच्या तिसर्या वर्षाचे निकाल जाहीर झाले. या तिसर्या वर्षात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पेण महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या डिपार्टमेंटमध्ये सलग तीन वर्ष तन्वी विलास गावंड या विद्यार्थिनीने 83.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळविला आहे. तन्वीच्या या यशाबद्दल …
Read More »सोमवारी उरणमधील दवाखाने बंद
इमर्जन्सी सेवा सुरू उरण : बातमीदार कोलकाता येथील रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 17) डॉक्टरांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा म्हणून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनही उरणमधील दवाखाने बंद ठेवणार असून फक्त इमर्जन्सी सेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे. कलकत्ता …
Read More »रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा -पालकमंत्री
रसायनी : प्रतिनिधी रसायनी परिसरातील बारा गावांतील शेतकर्यांची सोळाशे एकर जमीन सातशे ते आठशे रुपये एकरी या भावाने 1860 रोजी भारत सरकारने घेतली. यातील काही जमीन औद्योगिकीकरणासाठी वापरली, तर काही पडून आहे. याअगोदर हिंदुस्थान ऑरगेनिक केमिकल कंपनीच्या ताब्यातील जमीन इस्त्रो व बीपीसीएल प्रकल्पाला देण्यात आली असताना शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या विचाराधीन …
Read More »उरणच्या पाच वर्षीय चिमुरडीने केले कळसुबाई ‘सर’
उरणः प्रतिनिधी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे उरण तालुक्यातील भेंडखळ गावची हर्षिती भोईर या पावणेपाच वर्षांच्या चिमुरडीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असणार्या कळसुबाई शिखराला 7 जूनला गवसणी घालत हे अंतर अवघ्या साडेतीन तासांत पार केले आहे. आता ती माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत आहे. हर्षितीच्या या पराक्रमामुळे उरणसह भेंडखळ गावाचे नाव …
Read More »सवणेत शेकापला खिंडार
उरणः प्रतिनिधी पनवेल आणि उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सवणे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याने शेकापला मोठे खिंडार पडले आहे. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper