Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जिल्ह्यात सात गोवर्धन गोंवश केंद्र मंजूर ; इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले

पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यामध्ये सात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र मंजूर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील सात उपविभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे केंद्र मंजूर असून हे केंद्र चालवून गोसंवर्धनाचे काम करू इच्छिणार्‍या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, सन …

Read More »

उरणमध्ये कांदळवनांची खुलेआम कत्तल ; भूमाफियांच्या कृत्यानंतरही शासकीय अधिकारी निष्क्रिय

उरण : बातमीदार तालुक्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल खुलेआम सुरू आहे, मात्र स्थानिक प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहेत. भूखंड हडप करण्यासाठी ही कांदळवनाची कत्तल केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कांदळवनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खारफुटी जमिनीची धूप रोखतात. सागरी जीवांचे रक्षण करणारे, तसेच …

Read More »

उरण येथे ईद उत्साहात साजरी

उरण : वार्ताहर ईद हा मुस्लीम धर्मातील महत्त्वाचा सण आज बुधवार (दि. 5) रोजी रमजान ईद असल्याने उरण शहरात ठिकठिकाणी सुमारे चार हजार चारशे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केला. नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उरण पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा …

Read More »

गोपाळ म्हात्रे यांना मॉनिटरी राष्ट्रीय अ‍ॅवॉर्ड

उरण : बातमीदार मास वर्ल्ड फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या युवा व युवतींना राष्ट्रीय मॉनिटरी अ‍ॅवॉर्ड देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या वर्षी भारतामधील 200 जणांना हे अवार्ड देण्यात आले यामध्ये क्रीडा क्षेत्रात उलेखनिय कामगिरी केलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना दिल्ली येथे मोनिटरी …

Read More »

पिरवाडी समुद्र किनार्‍यावर वृक्षारोपण

उरण : बातमीदार उरण पिरवाडी समुद्र किनार्‍याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत थिंक डिफरंट सोशल वेल फेअर असोसिएशन व सेव्ह अवर बीच संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले. उरण तालुक्यातील झाडे, डोंगर, दर्‍या नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे उरण उजाड माळरान झाल्याचे चित्र …

Read More »

महापालिका हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

पनवेल, कामोठे : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत नवीन पनवेलमध्ये असलेले सिडकोचे श्वान निर्बिजीकरण केंद्र महापालिकेला हस्तांतरण केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍याअभावी बंद आहे. पनवेल महानगरपालिका  हद्दीत वाढणार्‍या श्वानांच्या संख्येमुळे हे नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी महासभेत पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी लवकरच …

Read More »

डुंगी गावाचेही होणार पुनर्वसन ; सिडकोच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : बातमीदार प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करण्यास सुरुवातीला नकार दिलेल्या डुंगी गावाचेही पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सिडकोने मान्य केला आहे. विमानतळासाठी विस्थापित केलेल्या अन्य 10 गावांतील प्रकल्पग्रस्तांप्रमाणे डुंगी गावातील ग्रामस्थांना प्रत्येक घरासाठी तिप्पट बांधकाम खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सिडको भवनात झालेल्या बैठकीत डुंगी गावातील रहिवाशांनी सिडकोच्या …

Read More »

प्रभाग क्रमांक 20 झाला चकाचक

पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल भारतीय जनता पार्टी आणि पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मध्ये स्वच्छता अभियान पार पडले. या अभियानामुळे प्रभाग क्रमांक 20 चकाचक झाला आहे. विशेष म्हणजे दानशूर …

Read More »

जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील चावणे, कुराडे खुर्द आणि जांभिवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जांभिवली ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या रिया कोंडीलकर यांच्यासह सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी तहसील कार्यालयात दाखल केले. …

Read More »

गाढी नदीच्या साफसफाई मोहिमेत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त निसर्ग मित्र, पनवेल या संस्थतर्फे बुधवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 6.30 वाजता चिपळे पूल येथे गाढी नदीच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी चिपळे पूल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. …

Read More »