पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील रायगड जिल्हा प्राथमिक फेरीचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक …
Read More »भारत सरकारकडून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वांत स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावित विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे फक्त …
Read More »सिटीझन पर्सेप्शन सर्व्हेमध्ये सहभागी होण्याचे पनवेल मनपाचे आवाहन
पनवेल ः प्रतिनिधी देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा केंद्र शासनाने आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये एक लाख लोकसंख्या व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत. पनवेल महापालिकाही या स्पर्धेत सहभागी झाली आहे. सिटीझन पर्सेप्शन सर्वेमध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन …
Read More »कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा
पनवेल ः वार्ताहर बजाज फायनान्स कंपनीकडून सात लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने कळंबोलीत राहणार्या व्यक्तीला 70 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी सायबर चोरट्यांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार संजयकुमार जाधव (58) कळंबोलीतील रोडपाली भागात …
Read More »आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोचा पुढकार
अर्जदारांना कागदपत्रांविना 30 लाख रुपयांचे गृहकर्ज पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, परंतु उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बँक तयार होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने पावले उचलली आहेत. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांना कागदपत्रांविना 30 …
Read More »पनवेल बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन
काँग्रेसची यात्रा थांबविण्याची मागणी; निवदेन सादर पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून शुक्रवारी (दि. 18) पनवेलमध्ये शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक अॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी यांच्या फोटोला …
Read More »शेखर पाटील यांची भाजपमधूून हकालपट्टी
पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे उरण तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष शेखर भास्कर पाटील यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शेखर पाटील हे युवा मोर्चाचे पदाधिकारी असतानाही त्यांनी पक्षाची जबाबदारी पार न पाडता सतत पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्याचबरोबर पक्षाला कोणतीही सूचना न देता बोकडवीरा ग्रामपंचायतीच्या आगामी …
Read More »खारघरमधील हॉटेल निरसुख पॅलेसला आघाडी सरकारच्या काळात मद्यविक्री परवानगी
आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती; प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील हॉटेल निरसुख पॅलेसला महाविकास आघाडी सरकारच्या काळात परवानगी मिळाल्याचे प्रथमदर्शी उघडकीस आले आहे, अशी माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका मुलाखतीत दिली. मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्याने खारघरवासीयांमध्ये तीव्र रोष आहे. खारघरला दारूमुक्त ठेवण्याचा …
Read More »भगवान बिरसा मुंडा चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप नेते संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त महान जनजाती स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती व राष्ट्रीय जनजाती गौरव दिन पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा होत आहे. त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम आणि पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून तसेच भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »रिटघरच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते उच्च माध्यमिक विद्यालयाने यश प्राप्त केले आहे. विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालय येथे झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत श्री भैरवदेव विद्यालय व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper