Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये झाड कोसळले

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये बुधवारी (दि. 13) सकाळपासूनच तुफान पावसाने हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर  येथे असलेले एक उंबराचे झाड मुळासकट कोसळले आहे. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडी वर ते पडले असल्याने गाडीचे नुकसान झाले आहे, तसेच …

Read More »

उरणचे पाणीसंकट टळले; रानसई धरण ओसंडून वाहू लागले

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. बुधवारी (दि. 13) रानसई धरण ओसंडून वाहू लागले. याशिवाय 117.2 फूट एवढी …

Read More »

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी साधना धारगळकर

पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या झालेल्या पदग्रहण समारंभात अध्यक्षपदी साधना धारगळकर यांची निवड झाली. सेक्रेटरीपदी ममता राजीवन, व्हाईस प्रेसीडेंटपदी डॉ.शितल फरांडे, खजिनदारपदी भूमिका परमार, आयएसओ लता शहा, एडीटर अर्चना राजे, जॉईंट सेक्रेटरी सिध्दी लोखंडे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कल्पना कोठारी तर सल्लागार समितीमध्ये अरूणा आचरेकर, सिमा दाहेदार, प्रिती …

Read More »

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या प्रांतपालपदी डॉ. अनिल परमार

पनवेल : वार्ताहर रोटेरियन डॉ. अनिल परमार यांनी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल म्हणून सुत्रे स्विकारली. मावळते प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा ह्यांनी डॉ अनिल ह्यांना प्रांतपालपदाची कॉलर घातली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आंतरराष्ट्रीय रोटरी …

Read More »

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना वह्यावाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या कांबे व चांभार्ली येथील शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम व विद्यार्थ्यांना पोलीस काका आणि पोलीस दीदी संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल …

Read More »

सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. शिक्षण कधीही वाया जात नाही आणि आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सीए डॉ. प्रदीप कामथेकर यांनी बुधवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. …

Read More »

पनवेलमध्ये गुरुवारी ‘भेटला विठ्ठल माझा’; सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल

पनवेल : रामप्रहर वृत्त आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने गुरुवारी (दि. 14) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलमध्ये ’भेटला विठ्ठल माझा’ सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्‍या या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेते …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे भागातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत नेरे विभागात मंगळवारी (दि. 12) वह्यावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …

Read More »

उरणमध्ये घर कोसळून आदिवासी बांधवाचा मृत्यू

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर मुसळधार पावसात घर अंगावर कोसळून एका आदिवासी बांधवांचा जागीच मृत्यू, तर त्याची पत्नी, मुले जखमी झाल्याची घटना उरण तालुक्यातील जांभुळपाडा आदिवासी वाडीत घडली. मागील पाच दिवसांपासून पडणार्‍या जोरदार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून काही रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. …

Read More »

पनवेलच्या ठाणा नाका येथे विविध उपक्रम

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी (दि. 12) साजरा झाला. ठाणा नाका येथील विक्रांत पाटील यांचा जनसंपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त रेझ्युलोशन हेल्थ केअरच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रिक्षाचालकांना सीएनजीचे कुपन आणि एक कुडूंब एक …

Read More »