Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी देवरत्ननगर चुनाभट्टी येथील देवरत्ननगर रहिवासी महासंघ आणि स्नेहा धार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हेल्पेज इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ बुधवारी (दि.10) देवरत्ननगर संकुलातील व्यायामशाळेत करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष विजय औंधे, मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष शरद डिचोलकर, …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात महिला दिनी ऑनलाइन व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात सोमवारी (दि. 8) महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरीता मुंबई क्राईम ब्रँच महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शितल …

Read More »

कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ व सुंदर गावासाठी सातत्याने काम करणार्‍या सरपंच माधुरी पाटील यांच्या प्रयत्नातून कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल झाली आहे. या वाहनाचे लोकार्पण सरपंच माधुरी पाटील यांच्या हस्ते झाले. 15 व्या वित्त आयोग निधीतून ही घंटागाडी उपलब्ध झाली असून या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यास उपसरपंच रंजना राम नाईक, …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने  पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली. संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास …

Read More »

पनवेल मनपामध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती

पनवेल : प्रतिनिधी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मुंबई-संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिका मुख्यालयात साजरी करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेविका हेमलता रवी गोवारी, नगरसेवक  गोपीनाथ भगत, उप-आयुक्त सचिन पवार उप-आयुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक …

Read More »

एमपीएससीच्या कामकाजात राज्य सरकारचा राजकीय हस्तक्षेप

पनवेलमध्ये अभाविपकडून निषेध पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी अचानकपणे पुढे ढकलण्यात आली. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगर व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अभ्यासिका ते पनवेल तहसील कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. …

Read More »

पनवेल परिसरात चोरीच्या वाढत्या घटना

नागरिक हैराण; पोलिसांसमोर आव्हान पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरी, ग्रामीण तसेच पनवेलच्या आजुबाजूच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चोरांना कोणतेही भय राहिलेले नसल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान आहे. फसवणूक, लबाडी, आमिष, घरफोड्या, हातचलाखी, हल्ला, अशा विविध प्रकारे ह्या …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत आजपासून रात्रीची संचारबंदी

पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 125 कोरोना रुग्ण आढळले असून, या आठवड्यात सतत 90पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिका हद्दीतील कोणत्याही व्यक्तीस …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीनिमित्त पनवेलमध्ये रेल्वे स्थानकाजवळ व अन्य ठिकाणी गरीबांना 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष …

Read More »

सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया

पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. अलिकडच्या काही दिवसांत कुटूंबातील सर्व सदस्य बाधित असल्याचे दिसून …

Read More »