पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्याची आवड दिवाळी अंकांतून होते, याच साहित्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पनवेल टाइम्स दिवाळी अंकाने जपली असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी मत व्यक्त केले. या प्रकाशन समारंभ कार्यक्रमाला पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, पत्रकार …
Read More »शिष्यवृत्ती परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी चमकले
गव्हाण : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दीक्षा …
Read More »कोरोनामुळे व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना भाजपकडून आधार
नगरसेवकांकडून प्रभागामध्ये देण्यात आला दिवाळी फराळ पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. लाखो नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. पनवेल तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढलेला असताना अनेक नागरिकांचे मृत्यू झाले. कोरोनामुळे मयत झालेल्या कुटुंबामध्ये दु:खाचे सावट पसरलेले आहे. त्यांच्या घरात पनवेल भाजप शहर मंडल …
Read More »ऑनलाइन दिवाळी पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद
कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाचे संक्रमण पाहता अनेक सण साजरे करताना आनंदाला कात्री लावावी लागली. या सर्व सणांत दीपावली विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सण आहे. या सणानिमित्त उल्हासमय वातावरण असते. दरवर्षी दिवाळी पहाट म्हणजे मैदाने हाऊसफुल्ल करणारी असायची, …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा आणि रॉयल टायगर असोसिएशनच्या वतीने आदई सर्कल येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …
Read More »स्मशानभूमीत काम करणार्या कर्मचार्यांना दिवाळी भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. कोरोना काळातही पनवेलमधील अमरधाम आणि पोदी येथील स्मशानभूमीत काम करणार्या कर्मचार्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांनी केलेल्या या सेवाकार्याबद्दल तसेच दिवाळी …
Read More »दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी आनंददायी व अनन्यसाधारण सण आहे. या सणाच्या अनुषंगाने फराळाप्रमाणे विविध साहित्य असलेल्या दिवाळी अंकांची निर्मिती केली जाते. दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 13) येथे केले.प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगड, अनिल …
Read More »उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सभा उत्साहात
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी सालाबादप्रमाणे संस्थेच्या वतीने कामगार-कर्मचार्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उचित सत्कार करण्यात आला. या सभेला उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, खजिनदार प्रशांत पाटील, तसेच इतर …
Read More »‘होप मिरर’च्या महिला सशक्तीकरण मोहिमेस प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशनने नुकतीच पहिली महिला सशक्तीकरण मोहीम राबविली. या वेळी यशस्वीरित्या नवी मुंबई आणि मुंबईत अनेक उपक्रम राबवित 300हून अधिक कुटुंबांना मदत करण्यासाठी, त्यांच्या कार्यसंघाने महिला सशक्तीकरण उपक्रमांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. मोहिमेस महिलांचा चांगलाप्रतिसाद मिळाला. होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ‘सिटी बेल’च्या प्रथम अंकाचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त समूह संपादक मंदार दोंदे आणि विवेक पाटील संपादित सिटी बेल या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 13) करण्यात आले. दिवाळीच्या शुभमुहूर्तापासून ‘सिटी बेल’चे इंग्रजी प्रकाशन वाचकांच्या सेवेत रुजू झाले आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper