माणगाव : प्रतिनिधी जगावर असलेल्या कोरोना नामक संकट दूर झाल्यावर पक्ष नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील महिलांना संघटीत करून सामाजिक उपक्रम राबवून त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे पटवून देऊन तालुक्यात भाजप महिला संघटन मजबूत करणार, असा दावा माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी प्रसार माध्यमांजवळ …
Read More »उरण तालुक्यात 29 जणांना लागण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 29 नवे रुग्ण आढळले आहेत तर 17 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात भेंडखळ(बीपीसीएल एलपीजी) येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी चार, जसखार दोन, जेएनपीटी दोन, हनुमान मंदिर जवळ नवापाडा करंजा दोन, न्हावा शेवा, बोरी, घारापुरी, …
Read More »पनवेल तालुक्यात 196 नवे कोरोनाग्रस्त
सात जणांचा मृत्यू; 242 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 24) कोरोनाचे 196 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 158 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 161 रुग्ण बरे …
Read More »पोलिसाच्या गाण्याची माजमाध्यमांवर चर्चा
पनवेल : बातमीदार सध्या समाजमाध्यमांवर पनवेलमधील एका पोलीस अधिकार्याने ‘शोर’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले ‘एक प्यारका नगमा है’ या गाण्याची चर्चा जोरात आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी रविवारी हे गाणे पुणे येथील एका स्टुडिओत जाऊन ध्वनिमुद्रित केले. गेल्या 20 तासांत 1200 जणांनी हे गाणे पाहिले …
Read More »सिडकोच्या घरांचे लवकरच वाटप
पनवेल : बातमीदार सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या महा गृहनिर्माण सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांची लवकरच वाटप प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली चार महिने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात सिडकोने लाभार्थी ग्राहकांच्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेल्या आहेत. यासाठी आता ‘निवारा केंद्र’ या सोडतीनंतरच्या पोर्टलद्वारे ऑनलाइन …
Read More »उरणच्या विलगीकरण कक्षात होणार्या समस्यांबाबत आरोग्य मंत्र्यांना निवेदन
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे महिलांच्या आरोग्याविषयी व उरण येथील विलगीकरण कक्षात होणार्या समस्येबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत त्यांना कोरोना काळात होणार्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य जनतेला खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. यात सर्वाधिक बळी महिलांच्या आरोग्याचा जातो, पैसे …
Read More »अँटीजेन चाचणी सेंटर सुरू करण्याची भाजपची मागणी
कोरोना नियंत्रणासाठी संजय भोपी यांचे पमपाकडे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचा प्रभाग समिती ‘ब’च्या हद्दीत कोरोना नियंत्रणासाठी अँटीजेन चाचणी सेंटर सुरु करा. त्या ठिकाणी कळंबोली, खांदा वसाहत आणि नवीन पनवेल परिसरातील नागरिकांच्या अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात याव्यात, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी मनपा आयुक्तांकडे …
Read More »उलवे नोडमध्ये तातडीने कोविड रुग्णालय सुरु करा
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात …
Read More »रायगडात सलग दुसर्या दिवशी 15 बळी; 422 नवे रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि.23) 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर 422 नवे पॉझिटीव्ह आढळले आहेत. दिवसभरात 266जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले. आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 171, पनवेल ग्रामीण 49, उरण 27, खालापूर 38, कर्जत 24, पेण 29, अलिबाग 49, मुरुड 11, माणगाव 9, रोहा 5, …
Read More »वाहनचालकास लुटणारे गजाआड; पनवेल शहर पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरालगतच असणार्या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणार्या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यातील एका आरोपीवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper