पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र …
Read More »नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे -संजय पाटील
पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये वाढला आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून वागल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये होणार नाही या दृष्टीने सर्वांनी नियम पाळावे व कामोठ्यातून कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन कामोठे वसाहतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील …
Read More »पेरणीच्या हंगामाला सुरुवात
मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी …
Read More »अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत
पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फायदा घेऊन व्यापार्यांकडून लूट
पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा …
Read More »पनवेल तालुक्यात 34 नवीन रुग्ण
तिघांचा मृत्यू; 32 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 12) कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तळोजा पानाचंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »नालेसफाई कामास सुरुवात
नगरसेविका राजश्री वावेकर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल सेक्टर 5 येथील नाल्याच्या साफसफाईच्या कामाला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात करण्यात आली. नगरसेविका राजश्री यांनी यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा केला होता. पनवेलच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील सेक्टर 5 येथील नाल्यामध्ये बाजूची भिंत व फूटपाथ ढासळून त्या ठिकाणी नाल्यात सर्व माती …
Read More »व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिकांपुढे आर्थिक प्रश्न
पनवेल : बातमीदार टाळेबंदीमुळे जिम व व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिक व प्रशिक्षकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्यापासून उत्पन्न पूर्ण थांबल्याने ’तंदुरुस्त’ असलेल्या या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. ’कोरोना संसर्गामुळे जिम बंद ठेवणे योग्य होते; पण आता व्यायामात सातत्य नसल्याने लोकांना आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागले आहेत. 14 मार्चपासून …
Read More »‘पनवेलमध्ये कोरोनाचे मृत्यू नियंत्रणात’
पनवेल : बातमीदार पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे झालेले मृत्यू केवळ कोरोनाची लागण झाली म्हणून नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. पनवेलमध्ये आजवर 36 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोन रुग्णांना उपचार उशिरा मिळाल्यामुळे मृत्यू झाला. मार्च महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठ्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या …
Read More »पनवेलमध्ये सम-विषम नियमांचे उल्लंघन
आठ दुकानांवर मनपाची कारवाई पनवेल : बातमीदार ’मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य सरकारच्या आदेशाने पनवेलमधील दुकाने सम-विषमप्रमाणे सुरू करण्यात आली आहेत. मात्र काही दुकानचालकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे प्रभाग अधिकार्यांनी परवानगी नसताना उघडलेल्या दुकानांवर गुरुवारी कारवाई केली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होत असून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper