Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कम्युनिटी किचनसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खारघर भाजप यांच्या वतीने अन्नछत्र (कम्युनिटी किचन) सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी (दि. 2) अनेक जणांनी आर्थिक मदत केली. यामध्ये ईश्वर नारायण पटेल 10,000 रुपये, दुर्गादास महाजन …

Read More »

गावागावांत जनता कर्फ्यूची हाक

पनवेल : बातमीदार – नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्या चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गावागावांत स्वयंघोषित जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे. घणसोली गावात सलग सहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले असून मंगळवारपासून गावात हा कर्फ्यू लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोपरखैरणेतील …

Read More »

पिडिलाईट कंपनी, टिआयएतर्फे पोलिसांना पीपीई किट वाटप

पनवेल : वार्ताहर – नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षणात्मक किट वितरित करण्यासाठी भारत आधारित अ‍ॅडव्हाईज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पिडिलाईट इंडस्ट्रीज जी फेविकॉल आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पिडिलाइट उद्योगांच्या वतीने तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याकडे 180 वैयक्तिक संरक्षक किट हस्तांतरित …

Read More »

एपीएमसीत भाज्यांची आवक निम्म्यावर

बाजाराला ‘बंद’चे स्वरूप पनवेल : बातमीदार  – कोरोना विषाणूची 14 जणांना लागण झाल्याने भाजीची वाहतूक करणारी निम्मीच वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात शुक्रवारी (दि. 1) दाखल झाली. गुरुवारी बाजारात भाजीची 169 वाहने आली होती, तर शुक्रवारी भाज्यांची 95 वाहने बाजारात आणली गेली. याच वेळी शनिवारपासून भाजी …

Read More »

विसपुते कॉलेजमध्ये ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र आणि कामगार दिन

पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन नवीन पनवेल मधील  आदर्श शैक्षणिक समूहाच्या श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (मुंबई विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) 87 डीएसएमच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाइन साजरा करण्यात येऊन आदर्श शैक्षणिक समूहाच्या बी.एड्. महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी …

Read More »

केगाव हद्दीत मृत डॉल्फिन

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्‍यावर शुक्रवारी (दि. 1) मृत डॉल्फीन मासा वाहून आला आहे. या मृत डॉल्फिन माशाची लांबी साधारणता आठ फूट असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. माणकेश्वर-दांडा समुद्र किनार्‍यावर मृत अवस्थेत आढळून आलेल्या डॉल्फिन माशाची माहिती येथील केगाव ग्रामपंचायतीने वनविभागाला …

Read More »

सावळे येथे दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील सावळे येथील दोन गटातील जमावाने वैयक्तिक कारणातून एकत्र जमून शाब्दिक भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन एका परिवाराला दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण करीत रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. या जमावाने रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचाही भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात परस्पर …

Read More »

‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात  त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी पाहता आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

वीजग्राहकांसाठी चेक ड्रॉप बॉक्स

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील वीजग्राहकांसाठी वीज वितरण कंपनीचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी विशेष उपाय योजना केली आहे. वीजग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. यासाठी नवीन यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी …

Read More »

जिल्हाधिकार्यांकडून उरणची पाहणी

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्याचा बुधवारी (दि. 29) धावता दौरा केला. कोरोनाबाबत या वेळी उरण येथील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनी या संदर्भात काही सूचना आणि मोलाचे मार्गदर्शन केले. कोरोनापासून दक्षता घ्या, खबरदारी घ्या, नागरिकांचे …

Read More »