अलिबाग : प्रतिनिधी देव, देशासाठी जीव ओवाळून टाकणारी पिढी घडविण्याची ताकद रायगड किल्ल्याच्या मातीत असून, त्या श्रध्देने प्रत्येकाने एकदा तरी किल्ल्यावर जावून तेथील माती आणून देवघरात ठेवावी, असे आवाहन शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी बुधवारी (दि. 17) रायगड जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान कार्यक्रमात केले. या वेळी …
Read More »मुरूडसह रायगडात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन
मुरूड : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 17) राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुरूड नगर परिषद कार्यालयाजवळही सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. या वेळी नागरिकांनी भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण …
Read More »तळाशेत येथील मंदिराचे लोकार्पण
माणगाव : प्रतिनिधी संत नामदेव हे पहिले राष्ट्रीय संत असून त्यांनी संपूर्ण देश जोडण्याचे काम केले. आपला पुनर्जन्मावर विश्वास नसून, या जन्माचे सोने करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यीक माजी आमदार रामदास फुटाणे यांनी माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे केले. भाजपचे तालुका अध्यक्ष आप्पा ढवळे यांनी आपल्या कमाईतून …
Read More »कर्जतमध्ये महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
कर्जत : बातमीदार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि तालुका बचत गट समन्वय समिती यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कडाव आणि नेरळ येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तालुक्यातील 61 बचत गटांनी या प्रदर्शनात स्टॉल लावले होते. नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात तहसीलदार विक्रम देशमुख …
Read More »पोलादपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पोलादपूर : प्रतिनिधी सुवर्णकार आणि कारागिर संघटनेने सोनार समाजाचे नेतृत्व करून विविध घटकांना प्रोत्साहित करण्यासोबतच स्वत:चे व्यवसायदेखील सचोटीने चालविण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी पोलादपूर येथे केले. सुवर्णकार व कारागिर संघटनेतर्फे पोलादपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …
Read More »कर्जतमध्ये ‘एक शाम देशभक्ती के नाम’
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत नगर परिषद, रोटरी क्लब आणि कराओके क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद सभागृहामध्ये एक शाम देशभक्ती के नाम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम …
Read More »खोपोलीत आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्ध्यांचा सन्मान
तब्बल 700 जणांचे शिबिरात रक्तदान खोपोली : प्रतिनिधी बुऽऽज् हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल यांच्या संकल्पेनूत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात घंटागाडी कामगारांचा तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या वेळी आयोजित केलेल्या शिबिरात सुमारे 100 दात्यांनी रक्तदान केले. कोरोना बाधितांना उपचारासाठी मदतकार्य करणार्या तात्कालिन नगराध्यक्षा सुमन औसरमल, …
Read More »खालापूर तालुका प्लास्टिक कॅरी बॅगमुक्त करण्याचा संकल्प
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालय व सहज सेवा फाउंडेशन यांच्या कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याच्या संकल्प प्रयोगाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) खालापुरातील सरनौबत नेताजी पालकर सभागृहात कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होेत असलेला कापडी पिशव्या उपलब्ध करून …
Read More »पेणमध्ये तिरंगा रॅलीला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेणमधील पत्रकार व महात्मा गांधी स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पेण शहरातील गांधी वाचनालयापासून निघाली ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »भाजप माणगाव शहराध्यक्षपदी नितीन दसवते
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तसेच भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने पक्षाच्या माणगाव शहर अध्यक्षपदी माजी उपसरपंच नितीन रामजी दसवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आमदार …
Read More »