Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खोपोली-खालापूर मार्गावरील खड्डे खालापूर पोलिसांनी भरले

खालापूर : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असणारी खाकी वर्दी बुधवारी (दि. 17) प्रवाशांच्या सेवेसाठी चक्क रस्त्यावर उतरली होती. हातात दंडूक्याऐवजी घमेली आणि फावडे घेऊन खोपोली-खालापूर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी श्रमदान केले. खालापूर तालुक्यातील अतिशय दुरवस्था झालेला रस्ता म्हणजे जुना मुंबई-पुणे महामार्ग आहे. …

Read More »

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीवर्धन भाजपकडून क्रांतीस्तंभ

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मानवंदना श्रीवर्धन : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीवर्धन भारतीय जनता पार्टी कडून सोमजाई मंदिराच्या पटांगणात असलेल्या क्रांतिस्तंभाला तसेच पेशवे मंदिरातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेला श्रीवर्धन म्हसळा व …

Read More »

माणगावजवळ ओढ्यात आढळली बेवारस कार

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील चांदोरे गावाच्या हद्दीत ओढ्यामध्ये बेवारस स्थितीत पडलेली एक कार पोलीस व रेस्क्यू टीमने मंगळवारी (दि. 16) क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. बेवारस स्थितीत ओढ्यामध्ये सापडलेल्या या कारबद्दल  नागरिकांत चर्चा रंगल्या आहेत. चांदोरे गावच्या हद्दीतील ओढ्यात एक कार (एमएच 14-डीएफ 4167) पडली असल्याची माहिती ग्रामस्थ सुजित शिंदे …

Read More »

रायगडात पक्ष्यांची दुनिया बहरली

विविध प्रजातींचे दर्शन, अभ्यासक, निरीक्षकांना पर्वणी सुधागड : रामप्रहर वृत्त दमदार पावसाने निसर्ग खुलला असून पक्ष्यांसाठी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सध्या देशी-परदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना ही पर्वणी मानली जात आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात विविध पक्ष्यांचे दर्शन घडते. अनेक पक्षांचा हा विणीचा हंगामसुद्धा …

Read More »

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खालापूरच्या कुणाल पिंगळेला कांस्यपदक

खोपोली : प्रतिनिधी पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडीवली गावचा रहिवासी आहे. या यशाबद्दल कुणाल पिंगळेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा …

Read More »

कर्जतच्या दोन खेळाडूंना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’

कर्जत : राष्ट्रीय ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत  कर्जतचे खेळाडु रोहिणी मोडक आणि गणेश तोटे या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावून कर्जत तालुक्याची मान उंचावली. हे दोन्ही सुवर्ण पदक विजेते खेळाडू कर्जत शहरातील संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू आहेत. राष्ट्रीय सब ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पॉवर लिफ्टिंग ऑफ इंडिया …

Read More »

अलिबागमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग : जिमाका भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त  अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानात सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. पोलीस दलाच्या पथकांनी या वेळी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत …

Read More »

रायगडात विजयी विश्व तिरंगा प्याराचा नारा

मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद कर्जत : प्रतिनिधी तालुका मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. कर्जतमधील  मध्यरात्रीच्या धवजारोहणाचे हे आठरावे वर्ष आहे. कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

मुरूडमध्ये साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

मुरूड : प्रतिनिधी शहरातील आझाद चौकात सोमवारी (दि. 15) सकाळी मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या वळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्टभक्तीवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिकेसादर केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने कोल्हापूरी मर्दानी …

Read More »

गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा -डॉ. लहाने

मुरूडमध्ये हिमोडायलेसीस मशीनचे उद्घाटन मुरूड : प्रतिनिधी मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढणे, ही चिंतेची बाब आहे . मुख्यतः गोड पदार्थ सेवन केल्यामुळे मधूमेह होतो आणि मधुमेहामुळे किडनी खराब होते. त्यामुळे शक्यतो गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा, असे कळकळीचे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथे केले. मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा …

Read More »