अन्यथा भाजप मोठे आंदोलन करणार; युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांचा इशारा धाटाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून मार्च महिन्यात ग्राहकांना दोन बिले अदा करण्यात आलेली आहेत. त्यातील एक बिल हे अतिरिक्त अनामत सुरक्षा ठेव रक्कम असल्याबाबत दिले गेले आहेत. त्यामुळे सर्वच ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेला आहे. आधीच …
Read More »कर्जत गारपोली येथे सिलिंडरचा स्फोट; दुकानाचे मोठे नुकसान
कर्जत : बातमीदार तालुक्यातील गारपोली येथे मंगळवारी (दि. 26) रात्री दुकानातील सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण दुका जळून खाक झाले आहे. कल्याण -कर्जत राज्यमार्गावर गारपोली गावाशेजारी जीवन शिंदे यांचे अल्पोपहार आणि चहाचे दुकान आहे. या दुकानात नाश्ता तयार करण्यासाठी असलेली शेगडी व सिलिंडरसह तेल असे ज्वलनशील साहित्य होते. मंगळवारी रात्री दुकान …
Read More »पडसरे पूल मोजतोय अखेरची घटका
ग्रामस्थांसह शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पडसरे गावाजवळील पुलाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. पडसरे गावासह, लोळगेवाडी, एकलघर व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला जोडणारा हा एकमेव पूल आहे. पुलावरून ग्रामस्थांसह आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी येथून ये -जा करतात. पावसाळ्यात पूल अचानक ढासळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पुलाची दुरूस्ती …
Read More »माणगावच्या नाट्यगृहाला निधीची साडेसाती!
बांधकाम रखडल्याने रसिकांची निराशा माणगाव : सलीम शेख शासनांनी माणगावात नाट्यगृह मंजूर केले असून त्याचे काम सुरु झाले आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला होता मात्र हे काम …
Read More »सीएमपी वेतनप्रणाली लागू करण्याची मागणी
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत मिळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुणे येथे आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित …
Read More »पाण्यासाठी वैशालीनगर तळाघर ग्रामस्थांचा रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा
पालकमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 26) रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही …
Read More »महिला बचत गटांसाठी उमेद सखी मंचची साथ
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट कर्जत : बातमीदार तालुक्यातील महिला बचत गट आणि महिला स्वयंसहाय्यता गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेद सखी मंचच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला अनेकांनी भेटी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत …
Read More »पोलादपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा
लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्यासह पावसाची हजेरी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात …
Read More »पेणजवळ मांडूळ तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांडूळ साप व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी उत्तम केरू रणशूर (वय 49, रा. मळेगाव, ता. …
Read More »स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर
विनायक पात्रूडकर आणि माधव पाटील सत्कारमूर्ती; उद्या होणार सन्मान कर्जत : बातमीदार स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक लोकमतचे विनायक पात्रूडकर यांना तर जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार माधव पाटील (पनवेल) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि. 27) …
Read More »