Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेण चिंचपाड्यात एकावर चॉपरचे वार; गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी पेणमधील चिंचपाडा येथे जतीन पाटील हे मोटारसायकल वरून जात असताना आरोपी  याने त्यांच्यावर दगडाने वार करून साक्षीदारावर चॉपरने वार केल्याची घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी 5.35 च्या सुमारास घडली आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादी जतीन चंद्रकांत पाटील रा. दया अपार्टमेंट, कवंडाळतळे, ता.पेण हे त्यांच्या मोटारसायकलने जात होते. …

Read More »

न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांवर जनतेचा विश्वास -विनायक पात्रुडकर

नेरळमध्ये संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याने पत्रकारांवर सत्य आणि विश्वासार्ह लिखाणाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी बुधवारी (दि. 27) नेरळ येथे केले. कर्जत प्रेस क्लबच्या वतीने नेरळ येथील जेनी ट्युलिप शाळेच्या प्रांगणात बुधवारी …

Read More »

समाजात शांतता टिकविणे महत्त्वाचे

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे प्रतिपादन माणगाव पोलीस ठाण्यातर्फे इफ्तार पार्टी उत्साहात माणगाव : प्रतिनिधी इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांतून हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेहभाव वाढून समाजात शांतता व बंधुत्वाचा संदेश दिला जातो, असे प्रतिपादन रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बुधवारी (दि. 27) सायंकाळी माणगाव येथे केले. माणगाव पोलीस ठाण्यातर्फे …

Read More »

कर्जतमध्ये आदिवासींचा आक्रोश मोर्चा

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार जागृत कष्टकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी  कर्जत तहसील कार्यालयावर  आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले होते. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी निवेदन स्वीकारुन आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कर्जतच्या आमराई पुलापासून निघालेल्या या आक्रोश मोर्चात जागृत कष्टकरी संघटनेच्या कार्याध्यक्षा नॅन्सी गायकवाड, …

Read More »

मोर्‍यांच्या कामामुळे मुरूडमधील रस्त्याची कामे थंडावली

मुरूड : प्रतिनिधी नगरविकास खात्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मुरूडमधील रस्त्यांच्या कामांना वेग आला होता, मात्र शहरातील नवाबकालीन गटारे व मोर्‍यांची कामे सुरू झाल्याने सध्या रस्त्याची कामे थंडावली आहेत. मुरूड शहरातील रस्त्यांच्या कामासाठी नगर परिषदेला नगरविकास खात्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी तातडीने …

Read More »

पेणमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास अटक

पेण : प्रतिनिधी शहरातील आर. के. वाईन शॉप या दुकानात  गुरुवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या सूरज सरबजित सिंग (रा. कुंभारआळी, पेण) या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा साथिदार सुंदर मोरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवार पहाटेच्या सुमारास दोन चोरटे शहरातील आर. …

Read More »

किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय माणगाव : प्रतिनिधी किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 27) जन्मठेप व 20 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदरची घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथे घडली होती. आरोपी महादेव गजानन …

Read More »

विंचूदंशावरील प्रतीलस उपयुक्त संशोधन

विंचूदंश प्रतीलसीचे संशोधनाचे श्रेय हाफकीन इन्स्टिट्यूट आणि हाफकीनच्या संशोधकांचे आहे. हे संशोधन संपूर्ण मानजातीसाठी उपयुक्त असल्याचे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी म्हटले आहे. डॉ. बावस्कर यांनी विंचूदंशावरील प्रतिलस संशोधनाव्यतिरिक्त फॉरॉन्सिक्युया डायग्नोस केला आहे. 1976 साली महाड कोकणात आल्यानंतर विंचूदंश रुग्णांवर उपचार सुरू केले, मात्र मृत्यूचे प्रमाण 30 टक्के एवढे चिंताजनक होते. …

Read More »

कर्जतमध्ये दोन दिवस भीम महोत्सव

कर्जत : बातमीदार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील बहुजन बांधव यांच्या माध्यमातून 29, 30 एप्रिल रोजी कर्जतच्या पोलीस परेड मैदानावर भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात दोन वर्षे भीम महोत्सव आयोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे या वर्षी बहुजन समाजात भीम महोत्सवाबाबत उत्सुकता आहे. कर्जत तालुका …

Read More »

नेरळसाठी 28.64 कोटींची नळपाणी योजना मंजूर

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीच्या नेरळ ग्रामपंचायतमधील नळपाणी योजना जुनी झाली होती. यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. दरम्यान, शासनाने नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली आहे. यासाठी 28 कोटी 64 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नेरळ आणि ममदापुर ग्रामपंचायतीची नळपाणी योजना 1998मध्ये …

Read More »