कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरातील कचर्याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना जीपीआरएस यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे करण्यावर कर्जत नगर परिषदेने भर दिला आहे. …
Read More »रोह्यात काळा, लाल भाताचे प्रयोग यशस्वी
खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले रोहे : प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान,समाधानकारक पाऊस, शेतीतील प्रयोग, योग्य नियोजन व शेतकर्यांची मेहनत यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात या वर्षी लाल व काळ्या पौष्टिक भाताचे उत्पादन व सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे. रोहा तालुक्यात गेल्या खरीप …
Read More »माथेरान रेल्वे स्टेशनजवळ आग
माथेरान : प्रतिनिधी माथेरान स्टेशन जवळलील नगरपालिका चाळीलाच्या परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वित्तहानी झाली पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन …
Read More »गुरे चोरून नेणार्या गाडीला अपघात
दोन गुरांची सुटका;नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार दोन गायींना पळवून नेणार्या जीपला कर्जत तालुक्यातील बाटलीचीवाडी येथे अपघात झाला. गुरांना बेशुद्ध करून चोरून नेणार्या गाडीचा चालक आणि अन्य एकाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिवंडी तालुक्यातील कोन गावातील बळवंत सुळे यांच्या मालकीची टाटा कंपनीची जीप (एमएच-43, व्ही-5593) कर्जत-मुरबाड …
Read More »वावोशी परिसरात दोन घरफोड्या; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 35 हजार रोख रक्कम तसेच पार्लरचे सामान चोरुन पोबारा केला. वावोशी फाटा येथील राजेंद्र जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे …
Read More »आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे रखडली; शेतकरी नाराज
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आंबोली धरणाच्या उजव्या व डाव्या तीर कालव्यांची कामे सात वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थी शेतकरी नाराज आहेत. लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले आंबोली धरण मुरूडपासून सहा किमी अंतरावर असून या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर आहे. आंबोली धरण प्रकल्पासाठी 29 …
Read More »उभा सरसगड वणव्यात होरपळला
सजीवसृष्टी व वनसंपदा झाली बेचिराख पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक सरसगडावर सोमवारी (दि. 28) रात्री पुन्हा मोठा वणवा लागला. त्यात वनसंपदा व प्राणी, पक्षी बेचिराख झाले. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वत्र लागणार्या वणव्याने वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे. सरसगडावर सोमवारी रात्री लागलेला वणवा मोठ्या प्रमाणात भडकला होता. या वणव्यात मोठी वनसंपदा, जीवसृष्टी …
Read More »घरकुलाच्या मागणीसाठी लाभार्थ्याचे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी माले गावातील मारुती अनंत भुंडेरे यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. साळोख तर्फे वरेडी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील माले या गावातील मारुती भुंडेरे यांना 15 व्या वित्त …
Read More »उपोषणकर्त्या अधिपरिचारिकांची प्रकृती बिघडली
अलिबागेत नवव्या दिवशीही उपोषण सुरूच अलिबाग : प्रतिनिधी आपल्या मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या अधिपरीचारिकांची प्रकृती बिघडू लागली आहे. उपोषणाचा मंगळवारी (दि 29) नववा दिवस होता. प्रकृती बिघडत असली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिपरिचरिकांनी केला आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षाचे प्रशिक्षण …
Read More »रायगडातील धरण क्षेत्रांत मुबलक पाणीसाठा
पाभरे धरणात सर्वाधिक, तर साळोख धरणात सर्वांत कमी पाणी रोहे : महादेव सरसंबे रायगडात 2021 मध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने या वर्षी धरण क्षेत्रातील पाणी पातळी कायम राहिली. त्यामुळे मार्च अखेरीस रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरण क्षेत्रांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येत …
Read More »