Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्नाटकमधील कार्यकर्त्याच्या हत्येचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : बातमीदार समान गणवेशासाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय 26) यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या वतीने कर्जत येथे बुधवारी (दि. 23) या हत्येचा निषेध करण्यात आला. हर्षा यांनी कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे मोठे आंदोलन उभे …

Read More »

मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ व त्यांचे तांडे  कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पाली-खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत. धनगर समाज बहुतांश ठिकाणी स्थिरावला असला तरी आजही मेंढपाळ गावोगावी आपला कबिला घेऊन भटकंती करताना दिसतोय. मान्सूनचा पाऊस …

Read More »

खालापूर तहसील कार्यालयात शुकशुकाट

खोपोली : प्रतिनिधी नवीन पेन्शन योजना रद्द करा इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्न तात्काळ सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि. 23)चिटपाखरूदेखील नव्हते. सरकारी निमसरकारी कर्मचार्‍यांनी लाक्षणीक संपाचा इशारा दिला होता, बुधवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात कर्मचार्‍यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. कर्मचारी संपावर …

Read More »

थळ येथील आरसीएफ कंपनीत स्फोट

एक गंभीर जखमी तर दुसर्‍याला मानसिक धक्का अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये बुधवारी (दि. 23)सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. तर एका कर्मचार्‍याला मानसिक धक्का बसला आहे. …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्यांचे माणगाव तहसीलदारांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने लाक्षणीक संप पुकारला होता. त्याला बुधवारी (दि. 23) माणगावातही प्रतिसाद मिळाला. समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली माणगावमधील राज्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले असून त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत तहसीलदार प्रियंका अयरे कांबळे …

Read More »

अस्मितेच्या लढाईसाठी आझाद मैदानात उपस्थित राहा

 सकल मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे यांचे आवाहन खोपोली, मोहोपाडा : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे येत्या शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाची ही अस्मितेची लढाई असून त्यात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समाज बांधवांनी  हजारोंच्या …

Read More »

कर्जतमध्ये ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर

कर्जत : बातमीदार आरपीआय (आठवले गट) शाखा दहिवली आणि  उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने कर्जत दहिवली येथे नुकताच ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 213 मजूर, कामगारांनी ई श्रम कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी केली. कर्जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरपीआय …

Read More »

चौकमध्ये विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ

चौक : प्रतिनिधी विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सौजन्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बादशा भोमले केले. बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीचे मानव संसाधन विभाग …

Read More »

माथेरान दस्तुरी नाक्यावर टॅक्सी चालकांवर पोलिसांची कारवाई

कर्जत : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील प्रवासी टॅक्सी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालविणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई केली आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे येणार्‍या पर्यटकांना …

Read More »

रायगडातील 15 हजार राज्य सरकारी कर्मचारी संपात सहभागी

अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबीत मांगण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी  बुधवारपासून (दि. 22) दोन दिवस संप पुकारला आहे. त्याला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे 15  हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे न शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट झाला होता. विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून शेकडो कर्मचारी बुधवारी …

Read More »