Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा

सांडपाण्यासोबत वाहत असलेल्या शेवाळामुळे नेरळ परिसरातील पाण्यावर पसरली हिरवळ कर्जत : बातमीदार बारमाही वाहणारी उल्हास नदी नेहमीप्रमाणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शेवाळ आणि जलपर्णीमुळे प्रामुख्याने वाकस पुलापासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंतच्या नदीपात्रातील पाणी हिरवेगार दिसू लागले आहे. खंडाळाच्या बोरघाटातून उगम पावणारी उल्हास नदी पुढे कर्जत तालुक्यातून वाहत जाऊन ठाणे जिल्ह्यात पोहचते. …

Read More »

आई डे केअर स्कूलमध्ये कलेतून रोजगार निर्मिती

पेण : प्रतिनिधी चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी पेण येथील आई डे केअर या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर गुढ्या बनवून रोजगारनिर्मिती केली आहे. सध्या बाजारात गुढीपाडव्यासाठी लागणारी काठी, साखरमाळ, वस्त्र, …

Read More »

पेणमधील वीज कर्मचारी संपावर

पेण : प्रतिनिधी ऊर्जा सचिव व महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 व 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेण कार्यालायातील कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले. एसईए संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव …

Read More »

संपकरी महसूल कर्मचार्‍यांचे रक्तदान

राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 28) राज्य सरकारविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी संपकरी कर्मचार्‍यांनी रक्तदान करून आपला निषेध नोंदवला. रायगड जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच तहसील, भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई मिळून 450 …

Read More »

सिद्धिविनायक मंदिर समितीचा प्रश्न चिघळणार

आगरी समाजाचा आंदोलनाचा एल्गार पेण ः प्रतिनिधी मुंबई प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे आगरी समाजाच्या देऊबाई पाटील यांनी 1801 साली बांधलेले असताना या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर याच आगरी समाजाला डावलून परस्पर परप्रांतीयांना स्थान दिले जात आहे. याविरोधात आता आगरी समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. शुक्रवारी (दि. 25) मुंबईतील …

Read More »

दहिगाव बौद्धवाडीत भीषण पाणीटंचाई

आमरण उपोषणाचा इशारा; बीडीओंना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील दहिगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले आहे. काही दिवसांत येथील पाणी प्रश्न सुटला नाही, तर 7 एप्रिलला ग्रामस्थांसह रिकामे हंडे घेऊन पंचायत …

Read More »

वढाव-बोर्झे खारभूमी योजनेला लवकरच नवीन ठेकेदार; तहसीलदारांचे आश्वासन

पेण ः प्रतिनिधी पाच वर्षांपासून रखडलेल्या वढाव-बोर्झे खारभूमी योजनेच्या कामासाठी नवीन ठेकेदार निवडण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू झाली आहे. या योजनेसाठी एप्रिलमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात येईल असे आश्वासन पेण तहसीलदारांनी दिल्याने मोठे वढाव ग्रामस्थांच्या मागणीला  यश आले आहे. वढाव-बोर्झे खारभूमी योजना नादुरुस्त झाल्याने खारे पाणी शेतात शिरून वारंवार शेतीचे नुकसान …

Read More »

खालापुरात भव्य सामुदायिक विवाह सोहळा; 70 जोडप्यांचे शुभमंगल सावधान

खालापूर : रामप्रहर वृत्त वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.चे विश्वस्त बेनी प्रसाद राऊका, सीएसआर नीता जोशी, …

Read More »

रायगडातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल!

समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पसंती पाली : प्रतिनिधी कोकणातील मुंबई व पुण्याजवळचा जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य व मनमोहक गारवा देणार्‍या स्थळांना पर्यटक मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे सागरी किनारे व अन्य पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. शनिवार व रविवार सलग लागून आलेल्या सुट्यांमध्ये पर्यटक एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात. …

Read More »

मिस्टर युनिव्हर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचे तीन बॉडी बिल्डर करणार भारताचे प्रतिनिधित्व

अलिबाग : प्रतिनिधी सध्या अलिबाग तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी आपले नाव सातासमुद्रपार घेऊन जात आहेत. त्यात आता तालुक्यातील तीन बॉडीबिल्डर्सची आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने अलिबागकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे येथे होणार्‍या 15 ते 17 एप्रिलदरम्यान मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, …

Read More »