मिरचीचे दर मात्र अद्यापही चढेच कर्जत ः प्रतिनिधी मार्चअखेर मिरची वगळता सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असताना भाज्यांचे दरही चढे असल्याने नाराजी व्यक्त होत होती, मात्र आता भाज्यांचे दर घटल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी भाज्यांचे भाव खूप वाढले …
Read More »रायगडातील विविध व्यावसायिकांसाठी पुरवठाविषयक कार्यशाळा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पुरवठाविषयक बाबींसंदर्भात विविध व्यावसायिक, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचार्यांची शुक्रवारी (दि. 25 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली. या कार्यशाळेमध्ये उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र राम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभागचे जिल्हा सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे, भारत पेट्रोलियम …
Read More »कर्जत शहरातील रस्त्यांसाठी सह्यांची मोहीम
पालिका प्रशासनाचे वेधले लक्ष कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी कर्जत शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंग यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्जत विकास समितीने रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. कर्जतकरांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला असून 700हून अधिक सह्या नागरिकांनी रविवारची सुट्टी …
Read More »खोपोली चिंचवलीत नवतरुण सेवा फाउंडेशनतर्फे स्वच्छता अभियान
खोपोली : प्रतिनिधी आपले गाव आपला परिसर स्वच्छ हवा तसेच रोगराईपासून दूर राहावे असा संदेश देत नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन या गावातील नवतरूण सेवा फाउंडेशन मंडळाच्या 20 कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबविली. शहर गाव स्वच्छ ठेवणे ही नगरपालिकेचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाचे स्वच्छता राखण्याचे कर्तव्य आहे. यासाठी रविवार सुट्टीचा दिवस …
Read More »पांढर्या कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी
उत्पादन घटले; अवघे 50 टक्के पीक बाजारात अलिबाग : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील प्रसिद्ध पांढर्या कांद्याला मोठा फटका बसला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली असली तरी उत्पन्नात घट झाल्याने केवळ 50 टक्के पांढरा कांदा बाजारात दाखल झाला. दोन महिन्यांत 35 टन कांदा …
Read More »नेरळमध्ये गानसम्राज्ञी स्व. लतादिदींना संगीतमय श्रद्धांजली
कर्जत ः बातमीदार गानसम्राज्ञी, भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना नेरळमध्ये श्री गजानन सामवेदिका संगीत क्लास यांच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लतादिदींची अजरामर गाणी या वेळी सादर केली. श्री गजानन सामवेदिका संगीत प्रशिक्षण केंद्राच्या वतीने स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून लतादिदींनी गायलेल्या व …
Read More »अपघातग्रस्तांना मदत करणार्या खोपोलीतील भक्ती साठेलकरचा सत्कार
खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर नित्याने अपघात होत असतात. त्या अपघातांमधील जखमींना वेळीच तातडीची उपचाराची गरज असते. त्यासाठी खोपोलीत अपघातग्रस्तांच्या मदतीने हा सोशल ग्रुप अनेक वर्षांपासून काम करीत आहे, या ग्रुपमधील एक महिला भक्ती साठेलकरही इतर कार्यकर्त्यांसोबत रात्री-अपरात्री अपघातग्रस्तांना मदत करीत असते. तिचा राज्य शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय …
Read More »कर्जत चारफाटा ते भिसेगाव रस्त्याच्या कामाची पाहणी
कर्जत ः बातमीदार कर्जत येथील चारफाटा ते भिसेगाव या भागातील रस्त्याचे काम गेले अनेक महिने सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून त्या कामाची पाहणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. कर्जत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ …
Read More »खालापुरात आज भव्य सामुदायिक विवाह सोहळा
खालापूर : रामप्रहर वृत्त वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे दुपारी 12 वाजता जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम; टँकर उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
पर्यटकांसह वाहनचालकांचा झाला खोळंबा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजजवळ शनिवारी (दि. 26) सकाळच्या सुमारास एक टँकर उलटून त्यातील रसायन रस्त्यावर पसरले. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. परिणामी वीकेण्डच्या सुटीसाठी निघालेले पर्यटक तसेच अन्य प्रवाशांचा खोळंबा झाला. एक्स्प्रेस वेवर सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. …
Read More »