म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा मार्केटमध्ये सध्या ओल्या हळदीचे आगमन झाले असून या हळदीकडे सर्वच जण आकर्षित होत आहेत. ग्राहक आलं-मिरची घेण्यासाठी जातो तेव्हा तिथे आल्याच्या शेजारी आल्यासारखीच दिसणारी ओली हळद आपलं लक्ष वेधून घेते. ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश …
Read More »रेल्वेस्थानकावर तुटलेल्या फरशीमुळे प्रवासांचा जीव धोक्यात
कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वेस्थानकावरील फलाटावर फरशीचे टोक बाहेर आल्याने प्रवाशांना दुखापत होऊ शकते. याबाबतीत रेल्वे प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्जत येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कर्जत रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक झाड आहे. त्या झाडाच्या जवळ फरशा …
Read More »चौलमध्ये पुन्हा लसीकरण मोहिमेला प्रारंभ
रेवदंडा : प्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार चौल मुखरी गणपती मंदिर सभागृहात लसीकरणाला शुक्रवारी (दि. 7) सुरुवात झाली आहे. हे लसीकरण चौल अश्विनी रुणालय, चौल ग्रामपंचायत यांच्या अथक परिश्रमाने होत आहे. चौल ग्रामपंचायतीच्या वतीने अश्विनी रुग्णालय चौल यांचे सहकार्य व परिश्रमाने यापूर्वी चार हजार लसीकरणाची पूर्तता झाली आहे. त्या वेळी चौल तसेच …
Read More »नागोठणे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे संकट काही संपता संपत नाही. अवकाळी पावसाच्या सरी कधीही बरसत आहेत. वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका मात्र शेतकर्यांना बसत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला व जो काही शिल्लक राहिला होता तोही आता या अवकाळीने जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकर्याने जगायचे कसे, हा प्रश्न …
Read More »अमित घाग यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
धाटाव : प्रतिनिधी दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांचा वाढदिवस रोहा तालुक्यात रविवारी (दि. 9) ई-श्रम कार्ड योजना, विविध आदिवासी भागात ब्लँकेट वाटप, रोहा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. युवा मोर्चा रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ यांच्या माध्यमातून रोहा ग्रामीण रुग्णालयात …
Read More »पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार प्रचार
भाजपचा जाहीरनामा सरसच पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीची दुसर्या टप्प्यातील निवडणूक 17 जानेवारीला होत असून त्यासाठी सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीसाठीचे जाहीरनामे याआधीच प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा सर्व जाहीरनाम्यांमध्ये सरस आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा वचननामा आणि कार्यपूर्तीची यादी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून वचननामा …
Read More »बद्रुद्दिन दर्गाहचा उरूस रद्द
भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील बद्रुद्दिन दर्गाह सुप्रसिद्ध असून सर्व धर्मातील भाविक येथे दर्शनाला व नवसपूर्तीकरिता येत असतात. रायगड, ठाणे, पनवेल, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणत भाविक उरुसाला हजेरी लावतात. पेण तालुक्यातील निधवली येथे हजरत बद्रुद्दिन शाह हुसैनी यांची दर्गाह शरीफ असून सुमारे 700 वर्षांपासून …
Read More »कर्जतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
कर्जत : बातमीदार कर्जतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 44व्या ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी 14 जानेवारीपर्यंत चालणार्या सप्ताहात कीर्तन, प्रवचन, भजन होणार नसून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पारायण व हरिपाठ होणार आहे. कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अखंड हरिनाम सप्ताह खुल्या मैदानात न घेता कर्जतमधील श्री …
Read More »पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नागोठणे : प्रतिनिधी येथील भाएसोच्या शेठ ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये 59व्या पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात नारनवर म्हणाले की, पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, फेसबुकपासून लांब राहावे. अनोळखी …
Read More »अश्वपालांमुळे लोखंडी रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत
घोडे नियोजित ठिकाणी बांधण्याची मागणी कर्जत : बातमीदार काही वर्षांपूर्वी तेथील उजाड झालेले जंगल संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वृक्षारोपण करून पुन्हा उभारले आहे आणि तेथे पुन्हा घोडे जाऊ नयेत यासाठी वनव्यवस्थापन समितीने बनवलेले लोखंडी रेलिंग अश्वपालांमुळे कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे ते सर्व घोडे त्यांना दिलेल्या ठिकाणीच बांधण्यात यावेत, अशी मागणी …
Read More »