पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या चार प्रभागांतील चार जागांच्या निवडणुकीसाठी 28 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. मंगळवारी झालेल्या छाननीत यातील आठ नामनिर्देशनपत्रे बाद झाली. त्यामुळे आता एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 5) दिली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पाली नगरपंचायतच्या …
Read More »पत्रकार दिनानिमित्त माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषध व फळवाटप
माणगाव : प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयात भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) औषधे व फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रारोगतज्ज्ञ डॉ. शंतनु डोईफोडे …
Read More »कर्जतमध्ये कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ; प्रशासन सतर्क
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यात पूर्वी एक-दोन कोरोना रुग्ण आढळत होते, आता त्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि. 5) एका दिवसात चक्क 27 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. फार्महाऊसेस आणि त्यानंतर सुरू झालेल्या लहान-मोठ्या रिसॉर्टमुळे कर्जतची आता पर्यटन तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार, तसेच सुट्टीच्या …
Read More »रायगड जिल्ह्यातील जमिनी लाटण्याचा डाव
रायगड जिल्ह्यात मोठमोठाले प्रकल्प येत आहेत. त्यासाठी जमिनी संपादित करण्याचे काम सुरू आहे. नवीन प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी घेतल्या जात आहेत, परंतु यापूर्वी औद्योगिक कारणांसाठी शेतकर्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, मात्र त्यापैकी अनेक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उद्योग सुरू करण्यात आलेले नाहीत. शेतकर्यांच्या पिकत्या जमिनी घेऊन त्या पड ठेवण्यात आल्या आहेत. हेच ‘उद्योग’ …
Read More »जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; 371 अॅक्टिव्ह रुग्ण; 2238 जण घेताहेत घरीच उपचार
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ही चिंतेची बाब असली तरी, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ती एक समाधानकारक बाब आहे. रायगडात सद्यस्थितीत दोन हजार 371 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2238 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते घरी विलगिकरण राहून उपचार घेत आहेत. …
Read More »किल्ले रायगडावर अघोरी प्रकार
मदार मोर्चा बदलावरून शिवभक्तांमध्ये संताप छत्रपती संभाजीराजेंची पुरातत्त्व विभागाकडे तक्रार महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावरील मदार मोर्चा येथील बांधकामाला पांढरा रंग फासून व तेथे चादर चढवून होत असलेल्या प्रकाराने शिवभक्तांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. या प्रकाराबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 6) पुरातत्त्व विभागास पत्र देऊन या प्रकरणी कारवाई करण्याची …
Read More »फणसाड अभयारण्यासाठी निर्बंध लागू; लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
मुरूड : प्रतिनिधी कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन फणसाड अभयारण्यात कोविड प्रतिबंधक लसीचे डोस न घेतलेल्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्रपाल राजवर्धन भोसले यांनी दिली. फणसाड अभयारण्यात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. शांतता, घनदाट …
Read More »सुधागडातील परळी गावात वाहतूक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष
पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या परळी (ता. सुधागड) गावात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून परळी गाव व येथील बाजारपेठेची ओळख आहे. पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला परळी गाव व बाजारपेठ पसरली आहे. आजूबाजूच्या …
Read More »शासकीय कर्मचार्याला मारहाण; तीन आरोपींना सश्रम कारावास
अलिबाग : प्रतिनिधी शासकीय कर्मचार्याला मारहाण करणे तीन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. या आरोपींना अलिबाग सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग-रोहा रोडवर वावे वळवली बस स्टॉपच्या दरम्यान 19 फेब्रुवारी 2018 रोजी मातीने भरलेले चार ट्रक थांबवून तलाठी कमलाकर गायकवाड आणि तलाठी सुदर्शन सावंत कायदेशीर कारवाई करीत होते. त्यावेळी …
Read More »बोर्झे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन
पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असून वाशी खारेपाट विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 5) बोर्झे येथे केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्हा नियोजन समिती मार्फत पेण तालुक्यातील बोर्झे-कणे रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी …
Read More »