पाली : प्रतिनिधी पाली खोपोली राज्य महामार्गावर सुधागड तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या परळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोच शिवाय बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना देखील रस्त्याने चालणे मुश्किल होते. यासंदर्भात वारंवार परळी ग्रामपंचायत व पाली पोलीस यांनी मार्ग काढण्याचा …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणकडून होतेय ग्राहकांची दिशाभूल; देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी महिन्यातून चार वेळा वीजपुरवठा दिवसभर खंडित
श्रीवर्धन : प्रतिनिधी देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली श्रीवर्धन तालुक्यात महिन्यातून तीन ते चार वेळा संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता वीजपुरवठा सुरू होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रात्री आठ ते नऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत होत असल्याने महावितरणकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून …
Read More »…तर काजूप्रक्रिया उद्योगांना मिळणार चालना
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक काजू झाडांची लागवड पोलादपूर तालुक्यात असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी आजही नमूद करीत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यात काजू प्रक्रिया उद्योगांचीदेखील सुरूवात झाली आहे मात्र राज्यातील वीज संकटामुळे भारनियमन आणि अतिरिक्त भारनियमनाच्या दुर्दैवी फेर्यात या प्रक्रिया उद्योगांची वाताहत झाली. सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना काजूप्रक्रिया उद्योगांसाठी ऊर्जाविषयक …
Read More »आत्महत्या रोखण्यासाठी सायकलवरून भारतभ्रमण
पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले. या काळात अनेकांचे रोजगारदेखील हिरावले, जवळचे नातेवाईक दूर झाले. अशीच परिस्थिती संजय बिस्वास उर्फ संजय बंजारा या तरुणावर आली. त्याने नैराश्यात आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्यानंतर सायकलिंगने त्याला नवचेतना देऊन तारले व आत्महत्येपासून परावृत्त केले. मग हा तरुण आत्महत्या रोखण्याचा संदेश …
Read More »मुरूड ग्रामीण रुग्णालयाची मद्यपी रुग्णाकडून तोडफोड
सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचारी हतबल मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मद्यपी रुग्णाने मंगळवारी मध्यरात्री (दि. 8) रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. रुग्णालयात एकही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्याला कोणी रोखू शकले नाही. दरम्यान, या आरोपीवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत असलेला …
Read More »बोटीतून प्रवासी समुद्रात पडला, पोहता येत असल्याने बचावला
मुंबई गेट वे-मांडवादरम्यानची घटना अलिबाग : प्रतिनिधी मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी भर समुद्रात पडल्याची घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली. प्रशांत कांबळे असे या प्रवाशाचे नाव असून पोहता येत असल्याने तो वाचला आहे. स्वतःच्या चुकीमुळे बोटीतून पडला असल्याने याबाबत …
Read More »14 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पनवेलचा संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 14 वर्षाखालील 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी संघांनी भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघाचा पराभव करीत विजेतेपदाचा मान मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या भेंडखळ संघांची सुरुवात अडखळत झाली. सलामीचा फलंदाज साम्य पाटील वगळता कोतणाही …
Read More »शुटिंगबॉल स्पर्धेत विद्युत मांडवखार संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी मॉडेल संघ रांजणखार आयोजित 63व्या कोकण विभागीय शूटिंगबॉल स्पर्धेत विद्युत मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविला, तर ए वन संघ मानकुळे उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक मॉडेल रांजणखार संघाने, चतुर्थ क्रमांक मॉर्डन स्टार रांजणखार संघाने प्राप्त केला. खारेपाटातील मॉडेल रांजणखार संघाने सलग 63व्या वर्षात पदार्पण केले असून सातत्याने स्पर्धा भरवून …
Read More »सोनगिरी किल्ल्यावर फडकला भव्य ध्वज
वेध सह्याद्री संस्थेच्या प्रयत्नांनी मोहीम यशस्वी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कर्जत-खालापूर तालुक्यांच्या मध्यभागी संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनगिरी किल्ल्यावर वेध सह्याद्री संस्थेच्या बीड खुर्द जांबरूंग पंचक्रोशी विभागामार्फत स्थानिक रहिवासी व सहकारी संस्थेच्या सहकार्याने भव्य भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. सोनगिरी किल्ल्यावर पूर्वी असलेला ध्वज कमकुवत झाला होता. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करीत …
Read More »पनवेलमधील आपट्याजवळ रेल्वे अपघातात दाम्पत्याचा मृत्यू
रसायनी, मोहोपाडा : प्रतिनिधी पनवेल-पेण रेल्वेमार्गावर आपटा स्टेशनजवळ असलेल्या सारसई पुलावरून जाणार्या पती-पत्नीचा रेल्वेगाडीची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 7) सकाळी घडली. योगेश खंडू जगताप (वय 31) आणि रजनी योगेश जगताप (वय 26, दोघेही राहणार आपटा, ता. पनवेल) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचे मृतदेह आपटा स्टेशनपासून काही …
Read More »