खोपोली ः प्रतिनिधी पर्यावरण विभागाची मुदत संपुष्टात आल्यानंतरदेखील दगड खदान, क्रशर सुरू ठेवणार्या दहा दगड खाणींवर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशाने शनिवारी (दि. 27) कारवाई करण्यात आली. दगड खाणीला महसूल पथकाकडून टाळे ठोकण्यात आले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या दगड खाणीबद्दल अनेक तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल …
Read More »जंजिरा किल्ला सोमवारपासून बंद
शेवटच्या सुट्यांमध्ये किल्ल्यावर अलोट गर्दी मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा सोमवार (दि. 29)पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटचा शनिवार-रविवारची सुट्टी साधून पर्यटकांनी किल्ला पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वारजवळ मोठी गर्दी झाली होती. त्यातच पावसाळा जवळ आल्याने लाटांचा …
Read More »बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड सरस
अलिबाग ः प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील 91.94 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे. तरीदेखील रायगडने मुंबई विभागात रायगड अव्वल स्थान मिळवले आहे. जिल्ह्यात तळा तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97.30 टक्के लागला आहे. फेब्रुवारी 2023मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या …
Read More »चौक हद्दीत वाकी नदीपात्रात अतिक्रमण
मंडल अधिकारी, तलाठ्यांची कारवाई; शासनाकडून पंचनामा खोपोली ः प्रतिनिधी धनिकाने तालुक्यातील आसरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाकी नदीपात्रात जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या दगडी भिंतीचे बांधकाम केल्याचे उघड केले झाले आहे. याबाबत मंडल अधिकारी किरण पाटील आणि तलाठी अमोल बोराटे यांनी बुधवारी (दि. 24) प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व …
Read More »खोपोलीत स्वच्छता कागदावर
कचर्याने गटारे तुडुंब भरली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता सर्वेक्षण अभियाना अंतर्गत सर्वत्र भिंती रंगवून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. भिंती रंगविण्यात लाखो रुपये खर्च होत असून, मात्र शहरातील स्वच्छता वार्यावर असल्याचे चित्र आहे. नगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य गटारे, नैसर्गिक नाले कचरा व गवताने तुडुंब भरली असून, …
Read More »सेझग्रस्त शेतकर्यांच्या जमिनी परत करा; भाजप नेत्यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या शेतकर्यांच्या जमिनीवर मुदतीनंतरही प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जमिनी शेतकर्यांना परत करण्यात याव्यात, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली. या मागणीस मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद …
Read More »एक्स्प्रेस वेवर ब्रेक फेल कंटेनरची सहा वाहनांना धडक
एक ठार, पाच जण जखमी खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत एका ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पुढे जाणार्या सहा कारना धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) रात्री घडली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत. पुणे येथून मुंबईमार्गे राजस्थानकडे जाणार्या …
Read More »मुख्यमंत्री सोमवारी नेरळजवळील सगुणाबागमध्ये
कर्जत ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. 22) नेरळजवळील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात भेट देणार आहेत. कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या जल, कृषी आणि पर्यावरणविषयक प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. त्याचवेळी सगुणा रुरल फाऊंडेशनकडून आयोजित सगुणा राईस टेक्निक (एसआरटी) पद्धतीने शेती करणार्या राज्यातील 30 शेतकर्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान …
Read More »रायगडात खरीप हंगामाचे नियोजन; 98 हजार हेक्टरवर होणार भात लागवड
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात 98 हजार 36 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, तर तीन हजार 37 हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाणार आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियेाजन भवन येथे झाली. त्या वेळी ही …
Read More »फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची संख्या वाढली
मुरूड : संजय करडे सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून उन्हाची तीव्र किरणे जमिनीवर पडू लागल्याने भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात तापमान सध्या 36 अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाल्याने लोकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाययोजना करून …
Read More »