भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची यशस्वी खेळी पेण ः प्रतिनिधी जस जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे पेणमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामध्ये एका पक्षातील कार्यकर्ते दुसर्या पक्षात प्रवेश करतानाचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयाला मिळत आहेत, पण अशा राजकारणाला शह देण्याचे काम भारतीय जनता …
Read More »महाडमध्ये जागतिक पर्यटन दिन
महाड : प्रतिनिधी पर्यटनाने जगाची आणि देशाची संस्कृती कळते. पर्यटनाने मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळतो, असे प्रतिपादन अल्केमी केमिकल्स कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक पुरुषोत्तम पाटील यांनी येथे केले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ट्रॅव्हल्स आणि टुरिझम विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरुषोत्तम पाटील बोलत होते. पर्यटन व्यवसाय करताना संवाद …
Read More »कर्जतमध्ये बोहरी समाजाकडून स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार
कर्जत : प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून बोहरी समाज, प्रोजेक्ट राईज आणि बुरहानी गार्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 2) कर्जत नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचार्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात …
Read More »सुधागडातील भेरव येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
पाली : प्रतिनिधी टाटा ब्ल्यू स्कोप व रोटरी क्लब अमनोरा पुणे यांच्या सहकार्याने भेरव (ता. सुधागड) येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे शुक्रवारी (दि. 1) लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब, टाटा ब्ल्यू स्कोप यांचे जनहिताचे काम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी या वेेळी केले. भेरव येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण …
Read More »बनावट नोटा छापून चलनात आणणार्या टोळीचा पर्दाफाश
अलिबागमध्ये त्रिकुटाला अटक अलिबाग : प्रतिनिधी बनावट नोटा छापून त्या चलनात आणणार्या टोळीचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अलिबागमधून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून बनावट नोटांसह त्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री हस्तगत केली आहे. जयदीप घासे, सुमीत बागकर आणि कौस्तुभ गिजम अशी अटक करण्यात …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे विविध उपक्रम
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त रक्तदान शिबिर, ई-श्रम आधार कार्डचे वाटप, सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ज्या नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे अशा एकुण 200 लाभार्थींना माजी आमदार तसेच भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साटम …
Read More »पाली एसटी बसस्थानकाला सांडपाण्याचा विळखा
नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पाली येथील बसस्थानक परिसर गटारातील सांडपाणी व घाणीचे आगार झाले आहे. येथील दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबीकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. …
Read More »छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर
अलिबाग : जिमाका निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मा. भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेला तेींशी कशश्रश्रिळपश अिि (तकअ) हा अॅप सर्व नागरिक, मतदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे अॅप झश्ररू ीीेींश (अपवीेळव)/अिि ीीेींश …
Read More »रोहा चणेरा येथे कृषी मेळावा
रोहे : प्रतिनिधी शेतकर्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी रोहा तालुका कृषी विभागाने चणेरा येथे नुकताच कृषी मेळावा आयोजित केला होता. या वेळी शेतीबाबतच्या विविध योजनांची माहिती देऊन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी उपस्थित शेतकर्यांना शेतीचे उत्पन्न कसे वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया …
Read More »पेण-जावळी एसटी सेवा सुरू करा
पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा अद्यापही नियमित सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील बहुतांश ग्रामस्थांना कंपनीत, तसेच महिलांना काम करण्यासाठी शहरात जावे लागत असते. एसटी सेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने परवडत नाही. त्यामुळे त्यांनी पेण-जावळी एसटी सेवा नियमित सुरू करण्याची मागणी …
Read More »