जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही -अॅड. महेश मोहिते मुरूड : प्रतिनिधी क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचे आरक्षण मुरूड नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाने गुपचूप बदलले असून, सदर जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते …
Read More »उत्पादन शुल्क विभागाची रोह्यात मोठी कारवाई
साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त रोहे : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रोहा तालुक्यातील कोपरी व कोपरी दापोली येथील खाडी किनारी व बेटावर असलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर कारवाई करून तब्बल तीन लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार अधीक्षक किर्ती …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील खड्डे बुजविले
कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता होती. त्याकडे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन फलाट क्रमांक तीनवरील खडे बुजविण्यात आले आहेत. कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3वर मुंबई ते खोपोली, कर्जत ते खोपोली तसेच …
Read More »हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांच्या प्रतिमेचे कडावमध्ये अनावरण
कडाव : प्रतिनिधी हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. 25) कडाव ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती भिमाबाई पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हुतात्मा नाग्याबाबा कातकरी यांची प्रतिमा कडाव ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी, अशी मागणी काही महिन्यापुर्वी माजी उपसरपंच किसन पवार यांनी केली होती. त्यानुसार …
Read More »लाचप्रकरणी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधकासह मुख्य लिपीक जाळ्यात
अलिबाग ः प्रतिनिधीनोंदणी केलेल्या गृहनिर्माण संस्थेचा प्रलंबित निकाल देण्याकरिता 40 हजार रुपयांची लाच घेताना रायगड जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे आणि त्यांच्या कार्यालयातील मुख्य लिपीक सुहास दवटे यांना रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.रोहा तालुक्यातील अष्टमी येथील माऊली इन्क्लेव्ह गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डरने सोसायटी करून दिली नव्हती. …
Read More »जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांसह स्थानिक नाराज
मुरूड : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागल्याने मुरूड परिसरात पर्यटक येऊ लागले आहेत. शनिवार, रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी मुरूड तालुक्यात पर्यटकांची हळूहळू गर्दी होत आहे, मात्र प्रमुख आकर्षण असलेला जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून स्थानिक व्यावसायिकदेखील नाराज आहेत. कोरोनामुळे मार्च 2020 पासून संचारबंदी व लॉकडाऊन अशी मालिका …
Read More »अलिबागमध्ये शाळेची घंटा वाजली!; चिंतामणराव केळकर विद्यालय झाले सुरू
अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची सोमवारी (दि. 27) पुन्हा घंटा वाजली. शाळेमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून अलिबागसह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये एप्रिल महिन्यापासून बंद होती, पण आता राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने शासनाने कोविड …
Read More »भडवळ-नेरळ रस्त्यावरून प्रवास बनलाय जीवघेणा
कर्जत : बातमीदारतालुक्यातील नेरळ-ममदापूर-भडवळ रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अतिवृष्टीमुळे या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा मातीचा भराव वाहून गेला असून, रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणार्या ग्रामस्थांना पाठीचे आजार उद्भवू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी हा रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे. नेरळ …
Read More »पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी मागे घ्यावी; पेण भाजप व मूर्तिकार संघटनेच्या वतीने पर्यावरण मंत्र्यांना निवेदन
पेण : प्रतिनिधीपीओपी गणपती मूर्तीवरील बंदी मागे घेण्यासाठी पेण भाजप व मूर्तिकार संघटनेच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. सेवा व समर्पण अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने शनिवारी खांदा कॉलनीतील चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पेणच्या …
Read More »चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन पेणमध्ये साजरा
पेण : प्रतिनिधी चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) पेणमध्येही साजरा करण्यात आला. या वेळी अंकुर ट्रस्ट व लोकमंच या संस्था व संघटनेच्या वतीने जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या नाग्या महादू कातकरी यांच्या स्मरणार्थ मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच श्रद्धांजली सभाही घेण्यात आली. जंगल राखणे आणि त्याचे संवर्धन करणे …
Read More »