Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडातील 14 तालुक्यांमध्ये आपला दवाखाना होणार सुरू

अलिबाग : प्रतिनिधी नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्याच्या 14 तालुक्यांमध्ये महाराष्ट्र दिनापासून अर्थात सोमवार (दि.1)पासून हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रत शेतमजूर संघटनेच्या संघर्षाला यश

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे आश्वासन रेवदंडा : प्रतिनिधी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटेनेच्या संघर्षाला यश आले असून जिल्हाधिकार्‍यांसमवेत कंपनी प्रशासन व उसर शेतमजूर संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले असल्याची माहिती उसर …

Read More »

झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दिलासा; पदावरून काढण्याच्या आदेशाला स्थगिती

पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या सर्व 11 सदस्यांना विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने पदावरून काढून टाकण्याचे निर्गमित करण्यात आले होते, मात्र या सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिलेली आहे. तक्रारदार माजी सरपंच ज्योती दत्ताराम तरे यांनी झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यांविरोधात …

Read More »

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती

अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आमदार दळवी यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. एका जुन्या प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने आमदार दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. निवडणुकीवरून दोन गटांत हाणामारी आणि शिवीगाळ …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात; वाहने एकमेकांना धडकली

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि. 27) विचित्र अपघात होऊन सुमारे 11 वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ मुंबई लेनवर दुपारी 1च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असल्याची माहिती समोर …

Read More »

रोह्यात विनापरवाना शेकडो झाडांची कत्तल

साग, जांभूळ, खैर, आंबा, ऐन, शिरसंची तोड; तक्रार दाखल होताच वनविभागाकडून थातूरमातूर कारवाई धाटाव : प्रतिनिधी रोहा येथील सानेगाव जंगल भागातील खाजगी जागेत बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड करण्याचा परवाना न घेता येथील शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल झाली परंतु वनविभाग प्रशासन सुस्त राहिले.तक्रारदाराने सातत्याने …

Read More »

शेकापचा लाचखोर सरपंच जेरबंद; मुरूडमध्ये कारवाई

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच मनीष नांदगावकर यांना एका शेतकर्‍याकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील आदाड येथील तक्रारदार शेतकरी यांनी गांडूळ खत बनविण्यासाठी शेडचे असेसमेंट …

Read More »

खोपोलीतील शिवस्मारक सुशोभीकरण काम रखडले; पालिकेचे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरणच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदार निधीच्या माध्यमातून 25 लाखाहून अधिक निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीत अधिक भर टाकून पालिकेच्या माध्यमातून हे सुशोभीकरणचे काम सुरू झाले. मात्र मागील काही महिन्यांपासून काम बंद असून  छत्रपती शिवाजी …

Read More »

कर्जतच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा दीपक मोहिते अजिंक्य

कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांच्या उत्सवानिमित्त शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती पुण्याचा दीपक मोहिते आणि येवल्याचा ज्ञानेश्वर केरे यांच्यात रंगली. मोहितेने केरे याला चितपट केल्याने तो अजिंक्य ठरला. मलंगगड भाल येथील कृष्णा ठोंबरे या दिव्यांग कुस्तीगीराने कुस्त्या चितपट करून सर्वांना अचंबित …

Read More »

राजपुरी ग्रामसेवकावरफसवणुकीचा गुन्हा दाखल करा

हरिदास बाणकोटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी मुरुड : प्रतिनिधी राजपुरी कोळीवाडा येथील सात घरे अनधिकृत असून ती पाडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मी मुरुड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो. त्यावेळी राजपुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका झिराडकर मॅडम व गट विकास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी मला ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते …

Read More »