Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नगरपरिषदेसाठी प्रभाग रचना आराखडा बनविण्याचे आदेश

पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेसह राज्यातील सर्व 227 नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रारूप वॉर्ड रचनेची …

Read More »

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण

मुरूड : प्रतिनिधी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 277 श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील अनेक गावांत 510 झाडांची लागवड केली आहे. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील बारशीव, काशीद, चिकणी, माजगाव, मोरे, मुरूड शहर, डोंगरी, आगरदांडा, टोकेखार, वावे, वांदरे, अंदाड या गावात कोकम, फणस, चिंच, जांभूळ, …

Read More »

कोरोनाचा ढोलकी विक्रीवर परिणाम

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या सावटाखाली साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवात यातील ढोलकीचा आवाज दाबला गेला आहे. आज रस्त्यावर ढोलकी विकण्यासाठी फिरणार्‍या विक्रेत्यांच्या ढोलकीचा आवाज कुणाच्या कानी पोहचत नाही. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी गावोगावी, शहरातील गल्लीबोळात खांद्यावर पाच, सहा ढोलक्या घेऊन, त्यातील एक ढोलकी वाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ढोलकीविक्रेते दरवर्षी फिरतात. कोरोनाने …

Read More »

खोपोली पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

खोपोली : प्रतिनिधी शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया शाळेच्या दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शनिवारी (दि. 21) खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना राख्या बांधल्या. शालोम एज्युकेशन सेंटरच्या अध्यक्षा रूपा मजेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे मतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. तेथे 27 विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. शाळेच्या …

Read More »

भातपिकावर बगळा रोगाचा प्रादूर्भाव; शेती धोक्यात

कर्जत : बातमीदार जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील 900 हेक्टर भाताच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी आधीच संकटात सापडला असताना आता भाताच्या पिकावर बगळा रोगाने शिरकाव केला आहे.त्यामुळे तालुक्यातील अर्ध्या भागातील भाताचे पीक बगाला रोगाने ग्रासले आहे. कर्जत तालुक्यातील भाताचे पीक जुलै महिन्यात आलेल्या महापुरात माती दगड शेतात घुसून …

Read More »

रायगडात 89.02 टक्के पाऊस

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. 21) दोन हजार 863  मिलीमीटर पाऊस पडला आहे. वार्षिक पर्जन्यमान सरासरीच्या 89.02 टक्के पाऊस पडला आहे.रायगड जिल्ह्याचे व वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. यंदा अडीच महिन्यांत 2863.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याचा अजून दीड महिना बाकी आहे. त्यामुळे या …

Read More »

महेंद्र कल्याणकर रायगडचे नवे जिल्हाधिकारी

अलिबाग ः प्रतिनिधीरायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.निधी चौधरी यांची मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

Read More »

बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त वार्यावर

नागरी सुविधांसह गुणांकाची राहिलेली रक्कम त्वरित द्यावी, बाधित शेतकर्‍यांची मागणी पेण ़: प्रतिनिधी तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम 2010 पासून सुरू आहे. मात्र प्रकल्पबाधित गावांचे पुनवर्सन झाले नाही. तसेच जमिनीवर भूसंपादन शिक्का असल्याने शेतकर्‍यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा तसेच संपादित जमिनीच्या गुणांकाची राहिलेली …

Read More »

श्री भायदेच्या धैर्याला राज्यपालांची शाबासकी

राजभवनावर केला सन्मान रेवदंडा ़: प्रतिनिधी काशीद पुल दुर्घटनेत अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या भायदे कुटूंबियांचे प्राण वाचवून असीम धैर्याचे दर्शन घडविणार्‍या श्री भायदे (वय 10) या मुलाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजभवनावर  सन्मान करण्यात आला. सागर मनोहर भायदे (ऐरोली, नवी मुंबई) हे 11 जुलै रोजी त्यांच्या मालकीच्या इर्टिगा कार …

Read More »

गोवंश हत्याप्रकाराविरोधात भाजप आक्रमक

आरोपींवर कठोर कारवाई करावी, माणगाव पोलिसांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी गोवंश हत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या गोवंश हत्या करणार्‍या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी व अशा घटनांना आळा घालावा, अन्यथा  तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी शुक्रवारी (दि. 20) माणगाव पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे …

Read More »