राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा रायगडात फटका अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील दोन वर्षात रेती उत्खननाचे लिलाव रखडले आहेत. वाळू व्यावसायिकांमधील वाद आणि शासनाची चुकीची धोरणे याला कारणीभूत ठरत आहेत. ज्या ठिकाणी लिलाव झाले तेथे प्रत्यक्षात वाळू उपसा सुरू होवू शकला नाही. या एकूणच विद्यमान परिस्थितीमुळे सरकारला कोट्यवधींच्या महसूलावर पाणी …
Read More »कर्जत-माथेरान मिनीबसचे सुधारित वेळापत्रक
कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील नागरिकांच्या मागणीनुसार कर्जत एसटी आगाराने गुरुवार (दि. 26) पासून मिनीबसच्या फेर्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कर्जत-माथेरान या मिनीबसच्या एकूण 10 फेर्या आहेत. माथेरानसाठी कर्जत एसटी आगाराने मिनीबस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थी व सामान्य नागरिकांसाठी चांगली सोय झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सेवा बंद …
Read More »दरडग्रस्त गावांची जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
उपाययोजनांची घेतली माहिती अलिबाग : जिमाका पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे, तसेच महाडमधील तळीये या दरडग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व येथील नागरिकांना शासकीय सोयीसुविधा देण्याबाबत आश्वस्त केले. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी बुधवारी साखर सुतारवाडी, …
Read More »प्रगतशील शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा
उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचे प्रतिपादन खालापूर, खोपोली : प्रतिनिधी माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या योजनेत सामील होऊन प्रगत शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी केले आहे. शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या माझी …
Read More »खालापुरात बेकायदा प्लास्टिक साठा
खोपोली : प्रतिनिधी राज्यात प्लास्टिक बंदीचा संकल्प असला तरी खालापूर नगर पंचायत हद्दीत अनधिकृतपणे प्लास्टिक साठा करण्यात आला असून भंगार व्यावसायिक नगर पंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि इंग्लीश शाळेच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत भंगार व्यावसायिकाने जागा घेतली आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून टेम्पोतून …
Read More »रुळ तुटल्याने कर्जत-खोपोली लोकल सेवा काही काळ ठप्प
खोपोली ़: प्रतिनिधी मध्य रेेल्वेच्या केळवली स्थानकानजीक रुळ तुटल्याने गुरुवारी (दि. 26) सकाळी कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्यानंतर काही वेळातच ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळी 8.15 कर्जत-खोपोली लोकल केळवली स्थानकाजवळ आली असता रुळ तुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. …
Read More »नेरळ ममदापूर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष
रस्त्यांची कामे मंजूर करण्याबाबत नेरळ ममदापूर विकास प्राधिकरण निरुत्साही कर्जत : बातमीदार तालुक्यातील ममदापूर आणि कोल्हारे परिसराचा नियोजित विकास साधण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने नगरविकास विभागाच्या सूचनेने नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरण स्थापन केले. गेल्या आठ वर्षात या प्राधिकरणमधून ममदापूर नागरी भागात रस्ते तयार करण्यात आले, मात्र हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. …
Read More »रायगड जि. प.चे सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल
पेन्शन वेळेवर नसल्याने मासिक बजेटवर परिणाम अलिबाग : प्रतिनिधी मागील दीड पावणेदोन वर्षांपासून आलेल्या कोविडच्या लाटेचा जसा विकास कामांवर परिणाम झाला आहे तसाच शासकीय कर्मचार्यांच्या वेतन आणि पेन्शनवर झाला आहे. सेवारत आणि निवृत कर्मचार्यांना वेतन, पेन्शन मिळत असले तरी ते अनियमित आहे. शासनाने उणे प्राधिकारावर (मायनस) निर्बंध लादल्याने वेतन आणि …
Read More »मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्क वाटप
मुरूड : प्रतिनिधी मुंबईतील पार्थ फाउंडेशन तर्फे मंगळवारी (दि. 24) मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्कचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातील डॉ. दिव्या सोनम यांनी मास्क स्वीकारले या वेळी कर्मचारीसुद्धा उपस्थित होते. एकदरा ग्रामपंचायत, भंडारी युवक संघ व शहरातील सर्व दुकानदारांनासुद्धा पार्थ फाउंडेशनने मोफत मास्क वाटप केले असल्याची माहिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अजित …
Read More »ठाकरे सरकारची दंडेल शाही
केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल महाड : प्रतिनिधी कोकणात जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होत असताना या यात्रेला खिळ बसावी म्हणून महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जन आशीर्वाद यात्रेला …
Read More »