नेरळ, बदलापूरमधील तरुणांनी झळकावला फलक कर्जत : बातमीदार नेरळ आणि बदलापूर अभियंते असलेल्या सहा तरुणांनी लेह लडाखला जाऊन समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर असलेल्या खरडुंगला पास येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथे या तरुणांनी तिरंगा झेंडा फडकवत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या …
Read More »मच्छीमारांना मदत करण्याचे मच्छीमार कृती समितीचे आवाहन; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना दिले निवेदन
मुरूड : प्रतिनिधीनैसर्गिक संकटे व औद्योगिक कारखान्याच्या प्रदूषणामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार मेताकुटीस आले असून केंद्र व राज्य सरकारकडून संकटात सापडलेल्या कोळी समाजास मदतीचा हात द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मंगळवारी (दि. 17) अलिबाग येथील तुषार शासकीय विश्रामगृह येथे कृती समितीचे …
Read More »मोदी है तो मुमकीन है -केंद्रीय मंत्री कपिल पाटील
पेणच्या मूर्तिकारांसह नागरिकांशी साधला संवाद पेण : प्रतिनिधी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत असून यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) पेण येथे केले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी पेणमध्ये …
Read More »एक राखी देशासाठी उपक्रमात राजमुद्रा फाउंडेशनचा सहभाग
धाटाव : प्रतिनिधी स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान तर्फे एक राखी देशासाठी या उपक्रम अंतर्गत दरवर्षी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्यात येतात. त्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग, अध्यक्ष राजेश डाके, कार्याध्यक्ष राजेश भगत यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. 16) 100 राख्या स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानकडे सुपूर्द करण्यात आला. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर, …
Read More »खोपोली शिळफाटा येथील इंदिरा गांधी चौक बनतेय अपघाताचे केंद्र
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रस्ते मात्र अरुंद आहेत. टपर्या, हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे येथील रस्ते दिवसेंदिवस अपघातग्रस्त बनत आहेत. शिळफाटा परिसरातील इंदिरा गांधी चौक तर अपघाताचे केंद्र बनत आहे. खोपोली शहरातून मुंबई – पुणे जुना महामार्ग जातो. यात खंडाळा घाटातून शिळफाटा येथून मुंबई दिशेने जाणार्या एकेरी रस्त्यावर …
Read More »भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला अलिबागमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला अलिबागमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यानेतृखाली निघालेल्या रायगडमधील जन आशीर्वाद यात्रेस मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ झाला. अलिबाग शहरात या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या सोबत परिषदेतील विरोध पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा उत्तर …
Read More »भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय मंत्री कपिल पाटील
पनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले. त्याचबरोबरीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागले पाहिजे, अशी …
Read More »भूमीपुत्रांवर अन्याय होणार नाही -कपिल पाटील
फार्मा पार्क प्रकल्पग्रस्तांचा अलिबागेत संवाद मेळावा अलिबाग : प्रतिनिधी रोहा, मुरूड तालुक्यातील फार्मा पार्क प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई कशाला, असा सवाल केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेवून स्थानिक …
Read More »खालापूरात दिराचा वहिनीवर अत्याचार
खोपोली : प्रतिनिधी दिराने वहिनीवर बळजबरी करीत दोनदा अत्याचार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील ढेकू गावात घडली असून नराधम दिराला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीडित महिला ही पती, मुले आणि दिरासह शंकर ढेकू गावातील मंदिरसमोर राहते. घरामध्ये पती व मुलांसह …
Read More »भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात आग
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत एन्डकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात सायंकाळी अचानक आग लागली. येथील पादचारी पुलावर शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेन लाईनवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडील पादचारी पुलावर सायंकाळी सात वाजता आग लागली. फारसा वापर नसलेल्या या पादचारी पुलावर सायंकाळी लागलेली …
Read More »