Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पाच महिन्यानंतर गजबजले रायगडचे किनारे

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे सरकारने निर्बंध हळूहळू सैल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आता रायगडच्या किनार्‍यांकडे वळू लागली आहेत. रायगडमधील अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, मुरूड इथल्या समुद्र किना़र्‍यांवर पर्यटक दिसू लागले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने रायगडमध्ये …

Read More »

चौकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई अविनाश देशमुख यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्रभाई शहा, सेक्रेटरी योगेंद्रभाई …

Read More »

मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या संयुक्तवतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतमधील नागरिकांनी कोरोना संकटाची भीती न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला.  कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष …

Read More »

विजयी विश्व तिरंगा प्यारा

नेरळमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण कर्जत : बातमीदार हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने नेरळमधील हुतात्मा चौकात मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी शूरवीर मयूर शेळके यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावावे, असे आवाहन मयूर शेळके यांनी या वेळी केले. त्याआधी सरपंच उषा पारधी आणि मयूर शेळके यांच्या हस्ते मशाल …

Read More »

पोलादपुरात वाकण हद्दीतील घरे, शेतजमिनींना तडे

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकण ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील धामणेचीवाडी आणि सानेवाडी येथील जमिनीला आणि घरांना भेगा पडल्या असून, तेथील ग्रामस्थांना कापडे येथील तात्याबा साने यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या चाळीसहून अधिक म्हशी, गाय, बैल, वासरू या पशुधनासाठी मोकळ्या जमिनीवर कोंडवाडा बांधण्यात आला असून, तेथे त्यांना ठेवण्यात आले आहे. …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी वाढता पाठींबा

माणगावात आगरी समाजाकडून नायब तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून माणगाव तालुका निवासी नायब तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले. दि. बा. पाटील यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक कार्यासाठी …

Read More »

पेण, कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; ठेव विमा कायद्यातील बदलाचा लाभ अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारने डिपॉझिट इन्शुरन्स कायद्यात केलेल्या बदलमुळे बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ठेव विमा योजनेंतर्गत एक लाखांची मर्यादा वाढवून आता पाच लाखांची करण्यात आली आहे. त्यामुळे एखादी बँक बुडाली तरी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंच्या …

Read More »

तासगाव आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट

माणगाव : प्रतिनिधी अविष्कार फाऊंडेशनच्या रायगड शाखेच्या वतीने माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडीमधील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देण्यात आले. कोरोना काळात रोजगार गमावलेल्या आदिवासी बांधवांच्या पाल्यांना सहाय्यभूत व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदिप नागे, कार्याध्यक्ष शंकर शिंदे यांच्या प्रयत्नातून सदर पुस्तक संच वाटप करण्यात आले. या वेळी …

Read More »

रोहा तालुक्यात 33,231 नागरिकांचे कोरोना लसीकरण

रोहे : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, मंगळवार (दि. 10)पर्यंत रोहा तालुक्यतील 33हजार 231 नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाने यांनी दिली. रोहा तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू …

Read More »

नेरळ, कर्जतमध्ये आज मध्यरात्री ध्वजारोहण

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ येथील हुतात्मा चौकात मध्यरात्री तिरंगा झेंडा फडकवून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. वांगणी रेल्वे स्थानकात लहान मुलीचे प्राण वाचविणार्‍या मयूर शेळके यांच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी भारताचा झेंडा फडकवला जाणार आहे. नेरळच्या हुतात्मा चौकात गेली 16 वर्षे मध्यरात्री स्वतंत्रता दिन साजरा केला …

Read More »