खोपोली : प्रतिनिधी येथील गोदरेज कंपनीने सीएसआर फंडातून शुक्रवारी (दि. 9) खोपोली कोविड सेंटरला तीन लाख 80 हजार रुपये किमतीच्या रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नगरसेवक मोहन अवसरमल नगरसेविका वैशाली जाधव, गोदरेज कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. देव, तानाजी चव्हाण, …
Read More »कोंझरीतील बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी
‘वायूदूत’ने वेधले जिल्हाधिकार्यांचे लक्ष अलिबाग : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे मातीचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. ते थांबविण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वायूदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष तृषाली पाटील यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. कोंझरी येथील गट क्र. 91 ही शासकीय जागा आहे. या जागतून …
Read More »उघाडीचा लिलाव पुन्हा करा
पेणमधील धोंडपाडा ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीस खारभूमी विकास विभागाकडून बजावण्यात आल्या होत्या, मात्र उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये ही नोटीस पोहोचली नव्हती, त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांना लिलावामध्ये सहभाग घेता नव्हता. हा लिलाव पुन्हा करण्याची मागणी धोंडपाडा गावातील शेतकर्यांनी केली आहे. खारभूमी विकास विभागाच्या …
Read More »घोणसे ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार
सरपंच, ग्रामसेवकांच्या चौकशी व निलंबनाची मागणी म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतीच्या बहुतांश आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचे दिसत असून, सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी आणि निलंबीत करावे, अशी मागणी माहिती आधिकार कार्यकर्ते योगेश महागावकर व ग्रामस्थांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे …
Read More »खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांचा विरोध
खोपोली : प्रतिनिधी येथील नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाचा आदेश नसताना व स्थायी समितीला अंधारात ठेवत परस्पर घेण्यात आलेल्या या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. नगरसेवक किशोर पानसरे यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यासाठी आवाज उठवला आहे. मालमत्ता कर …
Read More »भाजप किसान मोर्चाकडून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत येथे नुकतेच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अंजली पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आण्णासाहेब …
Read More »रायगडमध्ये रंगणार आरपीएल टी-20 स्पर्धा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा प्रीमियर लीग कमिटीतर्फे येत्या नोव्हेंबर महिन्यात आरपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. त्याची घोषणा आयोजकांतर्फे गुरुवारी (दि. 8) अलिबाग येथे करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील माळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी आरपीएल स्पर्धेचे अधिकृत बोधचिन्ह, …
Read More »खोपोलीत भाजपचा जल्लोष
खोपोली : प्रतिनिधी खासदार नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांचा बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी झाला, त्याचा आनंद खोपोली भाजपतर्फे साजरा करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. खोपोली नगर परिषदेतील गटनेते तुकाराम साबळे तसेच भाजपचे शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, …
Read More »भीमाशंकर अभयारण्यात ट्रेकर्स भरकटले; मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलिसांची शोधमोहीम
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी भीमाशंकरला गेलेले पनवेल कामोठे येथील पाच ट्रेकर्स तेथील अभयारण्यात रस्ता चुकले. रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या या ट्रेकर्सनी हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलीस भीमाशंकर अभयारण्यामध्ये पोचले. त्यांनी भरकटलेल्या ट्रेकर्सना शोधून काढले आणि खांडस येथे सुखरूप आणले. पनवेल कामोठे येथील एक लहान मुलगा, चार महिला आणि …
Read More »किल्ले रायगड परिसरात हवाई बी पेरणी
अलिबाग : जिमाका रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील किल्ले रायगड परिसरात नुकताच हवाई बी पेरणी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या हस्ते या हवाई बी पेरणी उपक्रामाचे उद्घाटन करण्यात आले. रोहा येथील उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे (महाड), निलेश पाटील (म्हसळा), प्रशांत …
Read More »