माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड परिसरात आलेल्या पॉस्को कंपनीचा फायदा स्थानिकांना नव्हे; तर येथील मूठभर पुढार्यांना, त्यांच्या मुलांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 13) माणगाव येथे बोलताना केला. विळे-भागाड एमआयडीसी प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाबाबत भागाड सरपंच प्रकाश …
Read More »रायगडात रेड अलर्ट
अतिवृष्टीचा इशारा; दोन दिवस धोक्याचे अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दोन दिवस पडलेल्या पावसाने नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.जिल्ह्याच्या बहुतांश …
Read More »अतिवृष्टीदरम्यान काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात 11 ते 15 जुलैदरम्यान जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीत घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास …
Read More »सुधागडातील पर्यटनबंदी उठवावी स्थानिकांचे तहसीलदारांना निवेदन
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सुधागड किल्ला, ठाणाळे व नेणवली लेणी येथे पर्यटकांना जाण्यासाठी सुधागड वन विभागाने बंदी घातली आहे. ही बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. सोमवारी (दि. 12) या संदर्भातील निवेदन पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले. येथील प्राचीन व ऐतिहासिक बौद्ध लेण्या इतिहासाला …
Read More »वरंडोली येथील मोरीचे पिलर्स ढासळले; महाड-रायगड मार्ग बंद पडण्याची शक्यता
महाड : प्रतिनिधी महाड-रायगड मार्गावर वरंडोली गावानजीक नाल्यावरील मोरीचे पिलर्स ढासळू लागल्याने हा मार्ग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. महाड-रायगड मार्गावर वरंडोली ते कोथूर्डे फाटा यादरम्यान एका वळणावरील नाल्यावर असलेल्या मोरीचे पिलर्स पावसामुळे ढासळू लागले आहेत. पिलर्सचे दगड ढासळून खाली पडू लागले …
Read More »पेणमध्ये कोरोनाचा वाढता कहर, 10 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत चालली आहे. जुलै महिन्याच्या 10 दिवसांतच कोरोना संसर्गामुळे जवळपास 27 रुग्णांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत असून नगरपालिका, पोलीस तसेच आरोग्य प्रशासनावर ताण येत आहे. पेण तालुक्यात 24 जूनला एका दिवसात 100च्या वर रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची …
Read More »वाढीव घरपट्टी रद्द करा; अन्यथा खोपोली भाजपचा आंदोलनाचा इशारा
खोपोली ः प्रतिनिधी येथील नगरपालिकेने आर्थिक वर्षात जी वाढीव घरपट्टी आकारली ती अन्यायकारक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ती रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना सोमवारी (दि. 12) दिले. मागील दोन वर्षांपासून कोविड महामारी तसेच लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. …
Read More »अलिबाग : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात तब्बल 69 जण पॉझिटिव्ह
अलिबाग ः प्रतिनिधीयेथील रायगड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून एकूण 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.अलिबागमधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत. …
Read More »रायगडात जोरदार पर्जन्यवृष्टी
पाणी शिरले, दरडी कोसळल्या; जनजीवन विस्कळीत मुरूड ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, मुरूडसह अन्य काही ठिकाणी पाणी शिरले. त्याचबरोबर दरड कोसळणे, भिंत पडणे अशा पझडझीच्या घटना घडून वित्तहानी झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी (दि. 12) संपलेल्या 24 तासांत सरासरी 80.76 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट …
Read More »पावसाच्या पुनरागमनामुळे रायगडात लावणीच्या कामांना वेग
अलिबाग : प्रतिनिधी पावसाने 12 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे रखडलेली भातलावणीची कामे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. लावणीच्या कामाला आता वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली. कडक ऊन पडल्यामुळे …
Read More »