कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्जत भाजप मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 2) तालुक्यातील दहा आदिवासीवाड्यांमधील 459 कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने भाजपच्या कर्जत तालुका मंडळाने ‘सेवाही संघटन‘ या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील …
Read More »…आता पुन्हा वीकेण्ड लॉकडाऊन
कर्जत : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळानंतर जीवनावश्यक सेवा देणार्या दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. तर वीकेण्ड लॉकडाऊनसुद्धा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश आले. तर वीकेण्ड लॉकडाऊन म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सारे काही बंद रहाणार आहे. नियमावली …
Read More »पेणमध्ये आक्रोश आंदोलन; महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप आक्रमक
पेण : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात गुरुवारी (दि. 3) पेण तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, प्रिया चव्हाण, जे. डी. पाटील, वंदना म्हात्रे, सरपंच बाबू कदम, महेश …
Read More »नेरळचे पोस्ट ऑफिस पाण्यात; नागरिकांना त्रास, अधिकार्यांचे मात्र दुर्लक्ष
कर्जत : प्रतिनिधी नेरळमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने नेरळ पोस्ट ऑफिसमध्ये पाणीचपाणी झाले. या मान्सूनपुर्व पावसात पोस्ट ऑफिसला तळ्याचे स्वरूप आल्याने तेथे येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे पोस्ट ऑफिसची इमारत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली …
Read More »शिथलतेनंतरही शटर बंदच
रायगडातील दुकानदार संभ्रमातप्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीएकीकडे वाढते लॉकडाऊन दुकानदारांना असह्य झाले असताना आठ दिवसांपूर्वी जी दुकाने पूर्ण वेळ सुरू होती त्या दुकानांचे शटरही दुपारी 2नंतर खाली ओढावे लागत आहे. अशात नव्याने काढलेल्या सुधारित आदेशानुसार दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आपल्याकडे सुधारित आदेश नसल्याचे …
Read More »पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित कापडे ते कामथे रस्ता
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची दूरवस्था झाली होती. हा रस्ता जागोजागी उखडला असून, या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश धोंडू मालुसरे यांनी केली होती. डागडुजीच्या जबाबदारीचे शेवटचे वर्ष असताना ठेकेदाराने या …
Read More »मॅसेजमुळे कर्जतमधील दुकाने उघडली
कारवाईमुळे व्यापार्यांना गाठावे लागले पोलीस ठाणे कर्जत : प्रतिनिधी येथील व्यापारी फेडरेशनच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, असा मॅसेज आल्याने कर्जत बाजारपेठेतील व्यापार्यांनी बुधवारी (दि. 2) सकाळी सर्व दुकाने उघडली. मात्र अकराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापार्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. …
Read More »विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, तसेच संभाजी ब्रिगेड, आगरी समाज संघटनेचे कार्यकर्ते दिलीप माळी यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, परीक्षा पॅड, कंपासपेटी, वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेत …
Read More »गर्दी रोखण्यात प्रशासन अपयशी
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे तर प्रशासकीय यंत्रणा शहरातील वाढती गर्दी रोखण्यात हतबल ठरली आहे. महाड शहरातील बँकांमधील गर्दी कायम आहे. याबाबत सुरुवातीपासूनच बँकांनी कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही शिवाय सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग)देखील ठेवले जात नसल्याने कोरोना रोखण्यात बँकांचा …
Read More »खोपोलीतील गटार पाच वर्षे तुटलेले
प्रशासनाचे दुर्लक्ष, रहिवाशांत संताप खोपोली : प्रतिनिधी शंभर टक्के कर भरणा करणार्या रहिवासी वस्तीतील एक गटार मागील पाच वर्षे तुटलेल्या अवस्थेत आहे. स्थानिक नगरसेवक, नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी व थेट नगराध्यक्ष यांना विनवणी करूनही या गटाराचे बांधकाम होत नसल्याने खोपोलीतील तीनशेहुन अधिक रहिवाशांत संताप व्यक्त होत आहे. खोपोलीतील आशियाना इस्टेट या …
Read More »