पाली : प्रतिनिधी कोरोना महामारीत मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व घरी बसून अभ्यास केला. मात्र त्यांना क्रीडांगणावर मैदानी खेळ खेळता आले नाही. क्रीडा स्पर्धादेखील झाल्या नाहीत. परिणामी अनेक मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढ व विकासावर परिणाम झाला असून ते अनेक कौशल्यांपासून दूर राहिले आहेत. शिवाय घरात राहून …
Read More »पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात
पेण : प्रतिनिधी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती बुधवारी (दि. 26) पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून संपुर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारी …
Read More »लसीकरणासाठी मुरूडमध्ये मोबाइल व्हॅन दाखल
रेशन दुकानदार यांनी घेतला लाभ मुरुड : प्रतिनिधी शासनाच्या योजना तसेच थेट जनतेशी संपर्क येणार्या यंत्रणांतील लोकांचे लसीकरण करण्यासाठी सर्व सुविधायुक्त मोबाइल व्हॅन बुधवारी (दि. 26) मुरूडमध्ये दाखल झाली असून, तहसीलदार गमन गावीत यांच्या उपस्थितीत या व्हॅनमध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. मुरूड तालुक्यातील रेशन दुकानदार, शिवभोजन केंद्र, गोदामातील हमाल, वाहन …
Read More »अलिबागेतील वादळग्रस्तांना भाजपकडून पत्रेवाटप
अलिबाग : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडाले. अलिबाग तालुक्यातील वादळग्रस्तांना आता भाजपाने मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपच्या माध्यमातून तालुक्यातील वादळग्रस्तांना छताच्या पत्र्यांचे वाटप करण्यात आले. अलिबाग शहराबरोबरच लगतच्या वरसोली कोळीवाडा , रोहिदास नगर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे वक्रीवादळात उडून गेले होते. त्यांना …
Read More »पेणमधील खारभूमी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे
उधाणाच्या पाण्याने नारवेल ते बेनवले बंधारा वाहून जाण्याची भिती पेण : प्रतिनिधी जागतिक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल ते बेनवले या 17 किमी लांबीच्या बंधार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात उधाणाच्या पाण्याने हा बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. …
Read More »खालापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची थाळी रिकामी
पाच महिन्यांपासून मोबदला नाही खोपोली : प्रतिनिधी कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणारी शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे. खालापूर तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला …
Read More »महाडमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व जनजागृती
महाड : प्रतिनिधी प्राईड इंडिया या संस्थे तर्फे महाड तालुक्यातील पारवाडीवाडी व करजखोल आदिवासीवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. या वेळी स्वच्छता व लसीकरणाबाबत जनजागृती करून स्वच्छता कीटही देण्यात आले. त्यामध्ये साबण, टूथ ब्रश आणि टूथ पेस्ट, मास्क तसेच खोबरेल तेल इत्यादीचा समावेश आहे. संस्थेचे व्यवस्थापक डॉ. कुलकर्णी …
Read More »कॅनरा बँकेकडून आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात
कर्जत पोशिरमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कर्जत : बातमीदार कॅनरा बँकेच्या सीएसआर निधीमधून पोशिर (ता. कर्जत) ग्रामपंचायतीमधील सहा वाड्यांतील 450 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. बँकेच्या कर्मचार्यांनी या वस्तूंचे वाटप केले. लॉकडाऊन काळात अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांच्या नोकर्या गेेल्या. या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील आदिवासींच्या मदतीसाठी कॅनरा बँकेच्या मुंबई …
Read More »विषारी औषध टाकून मासेमारी
जांभूळपाडा अंबा नदीत शेकडो जलचरांचा मृत्यू पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील अंबा नदीत बुधवारी (दि. 26) शेकडो जलचरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मासेमारीसाठी अज्ञाताने नदीच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने हे जलचर मृत पावले आहेत. मासे पकडण्यासाठी सुधागड तालुक्यात काही ठिकाणी पाण्यात विषारी औषध टाकण्यात येते. त्यामुळे नदीचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मदतीने भाजप युवामोर्चा पुरवणार रोह्यातील कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा
धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर रोहा तालुक्यातील गरजू कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन पुरविण्यात येेणार आहे. ही …
Read More »