Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

राज्यात चक्रीवादळाचा रुद्रावतार; विविध ठिकाणी पडझड; नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

अलिबाग ः प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाने देशाच्या दक्षिण किनारपट्टीपासून ते कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. हे वादळ गुजरातकडे जाणार असून या मार्गातील रायगड जिल्ह्यालाही त्याचा तडाखा बसणार आहे. मागील वर्षाचा निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव असल्यामुळे रायगडकरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून 2254 …

Read More »

वावळोली कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ’एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधे भेट देण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने निधी गोळा केला आणि त्यातून वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधांची भेट दिली. तहसीलदार दिलीप …

Read More »

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रास संपूर्ण किटसह ऑक्सिजन सिलेंडर भेट

कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थानचा मदतीचा हात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकी जपत  येथील बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले आहेत. कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा …

Read More »

पालीतील जनता कर्फ्युला प्रतिसाद

औषधांची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीमध्ये शनिवारपासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत रविवारी (दि. 16) दुसर्‍या दिवशीही औषधांची दुकाने सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. करोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पालीमध्ये शनिवार (दि. 15) पासून …

Read More »

एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, वाहनचालक बचावला

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झीटजवळ   चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो रविवारी (दि. 16) सकाळी महामार्गाच्या रेलिंगला जाऊन धडकला आणि पलटी झाला. या अपघातात वाहनचालक सुदैवाने बचावला. अद्रकने भरलेला टेम्पो एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईला जात होता. खोपोली एक्झीटजवळ रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो एक्सप्रेस वेच्याबाजूच्या रेलिंगला …

Read More »

आदिवासी बांधवांना धान्याची प्रतीक्षा

सुधागडातील आदिवासींचा जगण्यासाठी संघर्ष सुरु पाली : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला धान्य देण्याची घोषणा केली होती. त्याला आज एक महिना उलटून गेला तरी अद्यापही आदिवासी समाजातील लोकांना रेशन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. कोरोना संकटात सुधागड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधव आणि हातावर पोट असणारे घटक राज्य …

Read More »

कर्जत बेकरे येथे लसीकरण केंद्र सुरू

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बेकरे आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे  उद्घाटन जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी गर्दी होत होती. अनेकदा लांबून येऊनदेखील ग्रामस्थांना माघारी जावे लागत होते. त्यामुळे बेकरे आरोग्य उपकेंद्रात …

Read More »

वडखळ व पेणमध्ये नाकाबंदी

अनावश्यक फिरणार्‍या वाहनांवर कारवाई पेण : प्रतिनिधी लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही अनावश्यक फिरणार्‍या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पेणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, तेथे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण …

Read More »

माथेरानमध्ये पोचले दोन हजार किलो अश्वखाद्य

पशुसंपत्ती पशुसंवर्धन विभागाचे आर्थिक योगदान कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी  सरसावले आहेत. त्यांनी दोन हजार किलो …

Read More »

महाड, पोलादपुरात वादळापूर्वीच पडझड

पोलादपूर : प्रतिनिधी चक्रीवादळ येण्यापूर्वीच शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी वादळी पाऊस सुरू झाला. पोलादपूर तालुक्यातील धारवली, भोराव माटवण रस्ता आणि महाड तालुक्यातील राजेवाडी मोहल्ल्यातील मदरसा या भागात घरे आणि छप्परांचे वादळी वार्‍यामुळे नुकसान झाले. भोराव माटवण रस्तालगतच्या विजेच्या काँक्रीटच्या खांबाचा कनेक्टर्स जोडलेला भाग तुटून लोंबत असल्याचे दिसून आले तर काही …

Read More »