Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जेएसडब्ल्यू सिमेंटतर्फे ग्राहकांना ईझ ऑफ डुईंग बिझनेसची सोय

अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू सिमेंट या भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंट उत्पादक आणि 12 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग कामकाजात डिजिटायझेशन अमलात आणून एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आपल्या माध्यम भागीदारांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांनी यलोचॅट या जगातील …

Read More »

जय जय जय जय जय शिवराय

नेरळमध्ये अभिवादन कर्जत : बातमीदार नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, राजन लोभी, अतुल चंचे, नितीन निर्गुडा, …

Read More »

सुधागडातील वावळोली येथील आंबा फळपीक कार्यशाळेला शेतकर्यांचा प्रतिसाद

पाली : प्रतिनिधी फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंबा पिकाला जागतिक बाजारपेठेत सुगीचे दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून हॉर्ट सॅप योजनेअंतर्गत वावळोली (ता. सुधागड) येथील राजेंद्र राऊत यांच्या शेतावर गुरुवारी (दि.18) घेण्यात आलेल्या आंबा फळपीक कार्यशाळेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  कोकण कृषी विद्यापीठाच्या किल्ला रोहा येथील  कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत …

Read More »

रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम -निधी चौधरी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून समाजात वाहतूक नियम व रस्ते सुरक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईल व जनजागृतीही होईल. त्याचबरोबर रायगडमध्ये पर्यटन वृद्धीही जोमाने होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि. 20) येथे व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींच्या पुढाकारातून अलिबाग येथे दरवर्षी रायगड बाइक्स फेस्टिवल हा उपक्रम …

Read More »

पाली बायपासला शेतकर्यांचा विरोध

दुबार शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र पाली, झाप, बुरमाळी येथील शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत नव्याने होऊ घातलेल्या या बायपास मार्गाला कडाडून विरोध केला. नियोजीत पाली झाप बलाप बायपास …

Read More »

वाहतूक पोलिसांकडून देवदूतांचा सत्कार

पोलादपूरच्या नूरी पालोजी यांचा विशेष गौरव पोलादपूर : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलादपूर तालुक्यातील कशेडी टॅप वाहतूक पोलिसांकडून अपघाताच्या वेळी मदत करणार्‍या पोलादपूर आणि खेड तालुक्यातील देवदुतांचा सत्कार करण्यात आला.  या वेळी कशेडी घाटातील दरीत कोसळलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी सहकार्य करणारे नूरी पालोजी (रा. पोलादपूर) यांचा विशेष गौरव …

Read More »

चांगला विचार केला तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो -शारदा निवाते

कर्जत : प्रतिनिधी नेहमीच मोठा व चांगला विचार केला तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपले विचार, उच्चार आणि आचारही चांगले असावेत, असे प्रतिपादन  लेखिका डॉ. शारदा निवाते यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या वतीने कोरोना काळात राज्यस्तरीय निबंध, चित्रकला, काव्यलेखन, लेखन अशा 28ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात …

Read More »

दिघी बंदराच्या विकासाला लवकरच येणार वेग

दिघी बंदराचा विकास हा आगरदांडा बंदरसमवेत कऱण्यात येणार होता. परंतु आगरदांडा बंदर विकासापासून खूप दूर राहिले. अनेक वर्ष काम बंद राहिल्याने आगरदांडा येथे ठेवलेली सर्व यंत्रसामुग्री गंजून गेली. तर गेल्या अनेक वर्षांपासून दिघी बंदराच्या विकासाचे काम रखडले होते. मात्र आता दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी …

Read More »

‘सही रे सही‘ला सहकार्याचा हात

‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ असलेल्या टीमची मदतीसाठी धाव खोपोली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर  ‘सही रे सही‘ या नाटकाच्या कलाकारांची बस बंद पडली. याची माहिती कर्जतचे नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांना मिळताच, त्यांनी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण केले. टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर, सदस्य …

Read More »

महाडमधील बंद कॉलनीत आढळला मानवी सांगाडा

महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील इंटरनॅशनल होम टेक प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची त्रिंबक) या बंद कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये दोन वर्षापूर्वीचा मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) उघडकीस आली.  पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला सौरव अरूणकुमार दास (वय 22 रा. पीडीलाईट कॉलनी) सुट्टीनिमित्त आपल्या …

Read More »