Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

किल्ले रायगडावरील कामे एप्रिलअखेर पूर्ण करा

खासदार संभाजीराजेंच्या अधिकार्‍यांना सूचना महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्यावर सुरु असलेली विकास कामे येत्या एप्रिल महिन्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी (दि. 24) संबंधीत अधिकारी व ठेकेदारांना दिल्या.  खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी रायगड किल्ल्यास भेट दिली. या वेळी त्यांनी गडावरील रोप वे …

Read More »

सामाजिक बांधिलकी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील प्राथमिक शाळेतील 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर आणि त्यांच्या संस्थेचे नेरळ केंद्रप्रमुख शिवाजी दराडे यांनी टपालवाडी आणि लव्हाळवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना  दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल यांचे वाटप केले. …

Read More »

पर्यटकांचे खास आकर्षण रेवदंड्यातील टेन्ट हाऊसफुल्ल

रेवदंडा : प्रतिनिधी सध्याच्या धावपळीच्या जीवनात थोडासा विरंगुळा,  तसेच वन डे पिकनीक ही गरज बनली आहे. समुद्रकिनारी जाऊन मनाला फ्रेशनेस मिळविण्याचे फॅड सध्या रूजत आहे. त्यामुळे रेवदंडा, थेरोंडा समुद्रकिनारी कॅम्पींग सुविधा जोरात असून, तेथील टेन्ट हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसते. शहरवासियांना समुद्रकिनार्‍याचे वेड असल्याने कॅम्पीग टे्रड भलतेच फार्मात असून शनिवार, रविवार …

Read More »

धाटावमध्ये युवा वॉरिअर्स नामफलकाचे अनावरण

धाटाव : प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एक्सेल स्टॉप येथे नुकताच धाटाव पंचायत समिती गणातील युवा वॉरियर्स शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे रोहा तालुका …

Read More »

कोकणची लाइफलाइन होतेय पोलादपूरमध्ये अंडरपास

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वर पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यालगत चौपदरीकरणादरम्यान कोकणाची लाइफलाइन असलेला राष्ट्रीय महामार्ग अंडरपास होत असताना शहराच्या भविष्याचे संकेत देत आहे, मात्र राजकीय पक्ष आताही पोलादपूर नगपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल झालेले दिसून येत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता मिळाली. भूसंपादनाची …

Read More »

मोबाईल चोरी प्रकरणातील कर्जत पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस

कर्जत : प्रतिनिधी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले मोबाईल चोरी प्रकरणातील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर,  कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे …

Read More »

खोपोलीत भाजप दक्षिण भारत सेलची बैठक

खोपोली : रामप्रहर वृत्तखोपोली येथे प्रथमच भाजप दक्षिण भारत सेलची बैठक रविवारी (दि. 21) झाली. या बैठकीस खोपोली भाजप मंडलचे अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, मंडलचे सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर, स्थानिक भाजप नगरसेवक तुकाराम साबळे, जिल्हा दक्षिण भारत सेलचे श्रीनिवास कोडुरु, जिल्ला संयोजक थाहिर अली आणि श्रीमती यमुना आदी उपस्थित होते. साबळे …

Read More »

रेवस पाणी योजनेतच दुष्काळ; गावकरी 15 दिवस पाण्याविना

अलिबाग : प्रतिनिधी उन्हाळा असो वा पावसाळा अलिबाग तालुक्यातील रेवस पाणीपुरवठा योजनेचा दुष्काळ काही संपत नाही. गेल्या 15 दिवसांत या योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावकर्‍यांना पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. आज-उद्या अशी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी …

Read More »

रोह्याच्या कुंडलिका नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

धाटाव : प्रतिनिधी मुंबईहून रोह्यातील बाहे गावी आपल्या मित्राकडे आलेल्या दोन तरुणांचा कुंडलिका नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईहून 25जण शनिवारी (दि. 20) बाहे गावी सहलीसाठी आले होते. त्यापैकी काही तरुणांना पोहोण्याचा मोह आवरला नाही, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजिंक्य जयराम …

Read More »

अलिबागेत बाळशास्त्री जांभेकर जयंती

अलिबाग : प्रतिनिधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 20) आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या …

Read More »