Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रोहा-मुरूडमधील फार्मा पार्कच्या स्वागतासाठी सुनील तटकरे आतुर

रासायनिक प्रकल्पांवरून दुटप्पी भूमिका ; भाजपचे महेश मोहिते यांचा गंभीर आरोप अलिबाग : प्रतिनिधीकोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या, असे पत्र केंद्रीय रसायनमंत्र्यांना का लिहितात, असा सवाल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते …

Read More »

नेरळ-माथेरान रेल्वेचा होणार कायापालट

चार हेरिटेज ट्रॅकचा खासगी कंपन्यांमार्फत होणार विकास मुंबई : प्रतिनिधीअधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रेल्वेमार्गांच्या देखभालीवर तसेच इतर गोष्टींसाठी होणारा खर्च टाळण्यासाठी ‘युनेस्को’ने आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या महाराष्ट्रातील नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाबरोबरच देशातील अशा प्रकारच्या एकूण चार मार्गांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या मार्गावर ट्रेन्सची संख्या वाढविण्यात येणार …

Read More »

खोपोलीत घरफोडी; 74 हजारांचा ऐवज लंपास

खालापूर : प्रतिनिधी खोपोली विणानगरमधील अंजु शंकर सरकार (रा-वास्तु अपार्टमेन्ट)  कुटूंबासह पेण येथे गेल्या होत्या. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला व लोखंडी कपाटातील सोन्याचे 14 ग्रॅम वजनाचे 44 हजार 800 रूपये किंमतीचे मंगळसूत्र, सोन्याची साडेतीन ग्रॅम वजनाची 11 हजार 200 रूपये किंमतीची अंगठी आणि …

Read More »

डोंगरी गावाचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून बंद

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी ग्रुपग्रामपंचायत हद्दीमधील डोंगरी गावाला आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र महावितरणने वीज पुरवठा खंडीत केल्याने या योजनेतील पंप बंद झाला आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून डोंगरी गावात पाण्याचा थेंबही येत नाही, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोंगरी गावाला 2018पासून आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात …

Read More »

शेताचे बांध तोडून पाली-खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरण

बाधित शेतकर्‍यांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी खोपोली-पाली राज्य महामार्गालगतच्या पिकत्या शेतीचे कुंपण व बांध जबरदस्तीने तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बाधीत शेतकर्‍यांनी बुधवारी (दि. 17) या महामार्गावर उतरून रुंदीकरण कामाला कडाडून विरोध केला. जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत रुंदीकरणाचे काम होऊ देणार नाही, न्याय्य …

Read More »

वॉल लिक असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी

खोपोली : प्रतिनिधी जलवाहिनीचे वॉल नादुरुस्त असल्याने खोपोली नगर परिषद हद्दीतील वासरंग रेल्वेफाटकासमोर गेले दोन दिवस हजारो लिटर पाणी वाया गेले तसेच लौजी, श्रीरामनगर, उदयविहार या भागात पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेच्या जलवाहिनीचा वासरंग फाटकाजवळील वॉल नेहमीच नादुरुस्त असतो. गेली अनेक वर्ष या वालची कायमस्वरूपी दुरुस्ती …

Read More »

वंजारवाडी येथे तलाठी कार्यालयातील कर्मचार्याला मारहाण

कर्जत पोलीस ठाण्यात वाळू माफियावर गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील वंजारवाडी येथे पेज नदीमध्ये वाळू उत्खनन सुरू असताना भालीवडी तलाठी कार्यालयातील  कर्मचार्‍याने त्याबद्दल जाब विचारला, त्यावेळी वाळू माफियाने त्या कर्मचार्‍याला मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 15)घडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील भालीवडी …

Read More »

पोलादपुरातील आरोग्य यंत्रणेच्या बळींचा मुद्दा विधान परिषदेत

पोलादपूर शहरातील सैनिक नगरामधील माता मृत्यूप्रश्नी भाजपाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून जोरदार रणक्रंदन केले. आता काळवली गावातील शाळकरी मुलांचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी विधीमंडळाच्या आगामी अधिवेशन काळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. पोलादपूर तालुक्यातील दोन आरोग्य बळींसंदर्भात  आमदार …

Read More »

मुरूडमध्ये गाईवर चाकूने वार

फळविक्रेत्याचे कृत्य; गुन्हा दाखल मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील एका फळविक्रेत्याने त्याच्या हातगाडीवरील फळ एका गाईने खाल्याने रागाच्या भरात या गाईच्या पोटात चाकूचा वार केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) घडली. यामुळे गाय रक्तबंबाळ झाल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिक क्रोधीत होऊन त्यांनी फळविक्रेत्याला चोप देऊन राग व्यक्त केला आणि तत्काळ मुरूड पोलिसांना …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाच वाहनांचा भीषण अपघात; सहा जण ठार, चौघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली फूडमॉलजवळ पाच वाहनांच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई मार्गिकेवर मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ट्रक, टेम्पो आणि दोन कारवर एक कंटेनर मागून धडकून हा अपघात झाला. जखमींना पनवेल व नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »