अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात फार्म पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी मुरूड व रोहा तालुक्यांतील काही गावांमधील शेतकर्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे. या भूसंपादनास स्थानिक शेतकर्यांचा विरोध असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा त्यास विरोध आहे. त्यामुळे सरकारने भूसंपादन मागे घ्यावे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा …
Read More »रायगडात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
299 मतदान केंद्रांवर एक लाख 77 हजार 383 मतदार बजावणार हक्क अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवर एक लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी …
Read More »‘माथेरानच्या राणी’ला पर्यटकांची पसंती; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 33 लाख 61 हजारांची भर
कर्जत : रामप्रहर वृत्त अनलॉक होताच मुंबई आणि परिसरातील नागरिकांनी वन डे ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनीट्रेनमधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 33 लाख 61 हजारांची भर पडली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरात राहावे लागल्यामुळे सर्वांनाच बाहेर फिरण्याचे …
Read More »माथेरानमधील शाळांची घंटा वाजली
कर्जत : बातमीदार कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या माथेरानमधील शाळा सोमवारपासून (दि. 11) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये असलेल्या खासगी आणि नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट वाढला आहे. माथेरान येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर मराठी माध्यमिक विद्यालय आणि सेंट झेव्हीयर इंग्लिश माध्यमिक या दोन शाळा सोमवारपासून नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाच्या नियमांचे …
Read More »हा तर ट्रेलर, लढा अजून बाकी आहे!; ‘रिलायन्स’विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन 47व्या दिवशीही सुरूच
नागोठणे : प्रतिनिधी आम्ही रिलायन्स किंवा अंबानींच्या नाही, तर व्यवस्थेच्या विरोधात लढत आहोत. संविधानाचे कलम 19प्रमाणेच नागोठण्यातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. त्यात यश आता जवळ येत चालले आहे. हा ट्रेलर असून लढा अजून चालू झालेलाच नाही, अशी स्पष्टोक्ती माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी येथे सभेत केली. नागोठणे येथील रिलायन्स …
Read More »पेणमध्ये मकरसंक्रांतीची लगबग
सुगड पूजन परंपरेतून कुंभार समाजाच्या हाताला काम पेण : अनिस मनियार शहरासह संपूर्ण पेण तालुक्यात सध्या मकर संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. संक्रांतीसाठी लागणारी सुगडी बनवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. भारतीय सण, परंपरेमुळे कुंभार समाजाचा सुगडी बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय टिकून आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. तीळगूळ …
Read More »बर्ड फ्लू : रायगड जिल्ह्यातही सतर्कता
अलिबाग : प्रतिनिधी सध्या तरी रायगड जिल्ह्यात कुठेही पक्षी अथवा कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली नाही. अजून तरी रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नाही. तरीदेखील खबरदारी घेतली जात आहे. रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रत्येक तालुक्यात शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा …
Read More »नागोठणे विभागात महिलांचा भाजपकडे वाढता कल
महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान नागोठणे : प्रतिनिधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाड येथील सरकारी विश्रांतीगृहात नुकतीच भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी नव्याने नियुक्त केलेल्या रोहे तालुक्यातील महिला पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, …
Read More »बिरवाडीच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या
प्रवीण दरेकर यांचे आवाहन महाड : प्रतिनिधी बिरवाडी ग्रामपंचायत आणि नागरी समस्या येथील प्रस्थापितांना सोडविता आल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्याप्रमाणे बिरवाडी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 11) बिरवाडी येथील प्रचार रॅलीदरम्यान केले. …
Read More »‘बलिदानाचा संदेश’ तरुणांना प्रेरणादायी -वसंत कोळंबे
कर्जतमध्ये रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा कर्जत : बातमीदार सिध्दगडाच्या स्वातंत्र्य संग्रामवर आधारित ‘बलिदानाचा संदेश‘ हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणादायी असून सर्वांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन या पुस्तकाचे लेखक वसंत कोळंबे यांनी येथे केले. ‘बलिदानाचा संदेश‘ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व …
Read More »