Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळचे रेल्वे फाटक दोन दिवस बंद

कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ-भिवपुरी रोड रेल्वेस्टेशनदरम्यान असलेले फाटक 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या ठिकाणी असलेल्या रुळाखाली खडी टाकण्याचे काम करण्यासाठी हे फाटक बंद ठेवले जाणार असून यापूर्वी याच महिन्यात तीन दिवस फाटक बंद ठेवण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर …

Read More »

फणसाड अभयारण्यात रानगव्यांचा सुकाळ

पर्यटकांसाठी ठरतेय आकर्षण; स्थानिक शेतकरी धास्तावले मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी येथे आठ रानगवे होते, परंतु नवीन आकडेवारीनुसार हीच संख्या आता 11च्या वर गेली आहे. यापेक्षाही अधिक रानगवे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जंगलाच्या चौफेर रानगवे दिसू लागल्याने पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत असून त्यांच्याकडून …

Read More »

श्रीवर्धन बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

श्रीवर्धन ः प्रतिनिधी प्रदूषणासाठी सर्वांत घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत शासनाने आदेश काढून बंदी आणली आहे. मागील वर्षी प्रत्येक नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत व्यापारी, भाजी दुकानदारांच्या दुकानावर धाड घालून हजारोंच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या, मात्र यानंतरही काही व्यापारी छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास …

Read More »

मोड काढलेली कडधान्ये म्हणजे पोषणाचा खजिना

आरोग्य प्रहर कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. ‘क’ जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यात तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अ‍ॅसिड आणि …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, फळवाटप

रेवदंडा ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त भाजप युवा मोर्चा मुरूड तालुका यांच्या वतीने काशिद येथील मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास जिल्हा शासकीय रक्तपेढीचे विशेष सहकार्य आणि योगदान लाभले. भाजप मुरूड तालुका …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीचे जिंदाल यांच्याकडून जीवितास धोका

भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांची पोलीस संरक्षणाची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवनाची केलेली कत्तल आणि खाडीमध्ये अवैध भरावाबाबतची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी वन प्रशासनाने स्थळपाहणी अहवालाची प्रक्रिया राबविली, पण स्थानिकांनी ती कंपनीच्या इशार्‍यावर उधळून लावली होती. या प्रकरणात कंपनीचे …

Read More »

चक्रीवादळग्रस्त कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू, रोपांचे वाटप

लायन्स, डायमंड व लिओ क्लबतर्फे मदत अलिबाग : प्रतिनिधीलायन्स, डायमंड व लिओ क्लबतर्फे चक्रीवादळग्रस्त कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू तसेच नारळ व सुपारी रोपांचे वाटप करण्यात आले. सुमरादेवी, बेलीवाडी, मणेरपाडा, वडघर, आदाड, वाळवटी, वावे येथील आदिवासी वाड्यांतील सुमारे दोनशे कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच शेतकर्‍यांना सुमारे सव्वादोन लाख रुपये मूल्याची …

Read More »

रायगडात 615 नवे पॉझिटिव्ह; 16 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 615 नव्या कोरोना रुग्णांची आणि 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 18) झाली, तर दिवसभरात 790 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 290, पेण 78, अलिबाग 56, कर्जत व महाड प्रत्येकी 34, खालापूर 30, रोहा 26, माणगाव 24, पोलादपूर 18, तळा सात, …

Read More »

रायगड जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातही भाजपच्या वतीने ठिकठिकाणी सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. पेणमध्ये वृक्षारोपण, फळवाटप पेण : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन

पनवेल ः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर जनतेला …

Read More »