Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण ः प्रतिनिधी नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मांडल्या, मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून निराशाच पदरी पडत असल्याने नोंदणी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारपासून (दि. 1) बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. …

Read More »

कोरोना जनजागृतीसाठी दिव्यांग खेळाडू सरसावला

नागोठणे ः प्रतिनिधी राज्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातसुद्धा ही आरोग्य मोहीम राबविली जात आहे. याचा जास्तीत जास्त प्रसार होऊन रायगड जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्ह्यात नावाजलेल्या व्यक्तींकडून या संदर्भात आवाहन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने नागोठणे येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा …

Read More »

युवा मोर्चाची जिल्हा आढावा बैठक

धाटाव ः प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी निखिल चव्हाण व सहप्रभारी अ‍ॅड. ॠषीकेश जोशी तसेच जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा आढावा आणि पुनर्रचना बैठक कोलाड येथे झाली. युवा मोर्चाच्या पुनर्बांधणीसाठी तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या कामाचा …

Read More »

पिकेल ते विकेल योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी राज्य शासनाने पिकेल ते विकेल ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ पेण मतदारसंघातील शेतकरी व आदिवासी बांधवांना मिळावा तसेच या योजनेची माहिती त्यांना मिळावी यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून …

Read More »

सुधागडातील चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

पाली : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला आणि या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार आपदग्रस्तांना मदत केल्याचा दावा करीत असले तरी सुधागड तालुक्यातील आदिवासी व ठाकूर बांधव तीन महिने उलटून गेल्यानंतरदेखील नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात आदिवासी लोक भरडून निघाले आहेत. निसर्गाने …

Read More »

महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी महाड : प्रतिनिधीमहाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड-19 रुग्णांसाठी वापरण्याकरिता दुरुस्ती प्रस्तावास तातडीने निधी उपलब्ध करून …

Read More »

महानगर गॅस लाइनचे काम शेतकर्‍यांनी रोखले

खालापूर : प्रतिनिधीजोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत पाइपलाइनचे काम करण्यात येऊ नये असे सांगत खालापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी महानगर गॅसचे काम रोखले आहे. या संदर्भात शेतकर्‍यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. महानगर गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाइन कर्जत व खालापूर तालुक्यातूनही जाते, मात्र आमच्या जमिनीचा मोबदला …

Read More »

खालापूर तहसील आवारात आदिवासी विभागाचे उत्तरकार्य

राज्य शासनाविरोधात अनोखे आंदोलन खोपोली : प्रतिनिधीखावटी योजना आदिवासी जगवायला की मारायला असा संतप्त सवाल करीत श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (दि. 29) खालापूर तहसील कार्यालय आवारात राज्य शासनाच्या आदिवासी विभागाचे उत्तरकार्य केले. कोरोना संसर्गात जनजीवन ढवळून गेले आहे. हातावर पोट असलेला आदिवासी समाजदेखील त्यातून सुटलेला नाही. राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 …

Read More »

साजगाव फाट्यावर एसटी-कारचा अपघात

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली-पेण रस्त्यावर खोपोलीपासून चार किमी अंतरावर असलेल्या साजगाव फाटा येथे भरधाव कार व एसटी बस यांचा अपघात झाला. मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी अथवा जीवित हानी झाली नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरात पासिंगची फॉर्च्युनर …

Read More »

पोलादपुरात भातपिकावरील कीडरोग प्रादुर्भाव नियंत्रणात

पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील भातपिकांवर कीड आणि किटकांचा झालेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात कृषी कार्यालय यशस्वी झाल्याचा दावा तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केला आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, देवळे, वाकण, हळदुळे, दाभिळ येथे पावसाळ्यादरम्यान पडणार्‍या उघडीपीच्या काळात निळे भुंगेरे प्रकारच्या कीडरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला होता. …

Read More »