मुरूड : प्रतिनिधी गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा अलिबाग जवळील वानरटोक सुळका मुरूड शेगवाडा येथील अतुल मोरे, विशाल मोरे व तोषित नायडू या गिर्यारोहकांनी अवघ्या 40 मिनिटात सर केला. आणि या सुळक्यावर तिरंगा फडकवला. अलिबागपासून हाकेच्या अंतरावरावर सागरगड उर्फे खेडदुर्ग हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला असलेला वानरटोक नामक सुळका दुर्ग …
Read More »वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नका, अन्यथा कारवाई -पोलीस निरीक्षक रामदास इंगवले
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत. पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्था विना अपघात सुरळितपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता माणगावात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच वाहन चलविताना मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहन माणगावचे …
Read More »जिते येथे ट्रकची रिक्षाला धडक; तीन प्रवासी जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई- गोवा महामार्गावरील जिते (ता. पेण) गावच्या हद्दीत एका ट्रकने रिक्षेला पाठिमागून ठोकर दिली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षेमधील प्रवासी जखमी झाले. फिर्यादी (रा. बारपाडा, ता. पनवेल) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षे (एमएच-46, बीडी-7296) मध्ये मंगळवारी (दि. 13) रात्री प्रवाशी घेवून मुंबई -गोवा महामार्गाने पेण येथे …
Read More »परतीच्या पावसाचे थैमान
रोहा तालुक्यातील भातशेती गेली पाण्याखाली रोहे : प्रतिनिधी गेले चार दिवस रोहा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणार्या जोरदार पावसाने तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रोहे तालुक्यात भात पीक जोमात आले होते. …
Read More »परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान
रायगडातील बळीराजा हताश अलिबाग : प्रतिनिधी मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर क्षेत्रावरील भात शेती झोपली आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक गमावण्याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. राजाने मारलं आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, याची प्रचिती सध्या संपुर्ण महाराष्ट्रात येत आहे. …
Read More »खोपोली एक्झिटजवळ कारचा भीषण अपघात
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली एक्झिटजवळ ट्रकने हुलकावणी दिल्याने कार रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावरून खाली खड्ड्यात पडली. सुदैवाने ती दगडांमध्ये अडकली अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता. बुधवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कारमधील तीन जण सुदैवाने बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाची कार (क्र. चक 02 एन …
Read More »रोहा ग्रामीण रुग्णालयात फळवाटप
धाटाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून रोहा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व डॉक्टरांसह तेथील कर्मचार्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच रोहा तालुक्यात पाले (बुद्रुक) आदिवासी वाडी येथे …
Read More »पोलादपुरात भाजप कार्यालयाचे उद्घाटन
आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील भुमिपुत्र आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवशी पोलादपूर शहर भाजप कार्यालयाचे उदघाटन आनंदनगर येथे करण्यात आले. शहर भाजपचे उपाध्यक्ष सचिन बुटाला यांच्या निवासस्थानी आनंदनगर येथील माजी सैनिक हनुमंतराव येरूणकर यांच्याहस्ते फित कापून या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. …
Read More »माझे कुटुंब, माझी जबाबदारी
सर्व्हेक्षणाच्या कामात अडचणी अलिबाग : प्रतिनिधी राज्य शासनाने सुरु केलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम रायगड जिल्ह्यात कूर्मगतीने सुरु आहे. या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख 63 हजार 092 कुटूंब आहेत. यापैकी चार लाख 73 हजार कुटूंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना दानरत्न पुरस्कार; विश्व हिंदू परिषदेतर्फे सन्मान
खोपोली : प्रतिनिधी कोरोना कालावधीत समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या कोविड योद्ध्यांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात सोमवारी (दि. 12) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दानरत्न पुरस्कार, योगी भाईनाथ महाराज यांना कोरोना …
Read More »