Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात 448 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 448 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी (दि. 21) झाली. त्याचबरोबर 401 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 232, अलिबाग 58, पेण 32, खालापूर 29, महाड 20, रोहा 19, कर्जत 16, माणगाव 14, उरण व सुधागड प्रत्येकी …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी रायगडकर सज्ज

कोरोना व पाऊस झुगारून बाजारपेठेत गर्दी अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचे संकट, त्यानंतर बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यातून सावरले रायगडकर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारपासून (दि. 22) गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. रायगड जिल्ह्यात 287 सार्वजनिक आणि एक लाख 239 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणपतीच्या आगमनाची तयारी …

Read More »

मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण आणण्याच्या …

Read More »

सुधागडात आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्राची मागणी

पाली : प्रतिनिधी – शासनाच्या वतीने सुधागड तालुक्यात आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्र (फोर्स अकॅडमी) लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी रमेश पवार यांच्या नेतृत्वात पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले …

Read More »

अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशन देणार सेवा

कोरोना रुग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी डॉक्टर सरसावले मुरूड : प्रतिनिधी – येथील डॉ. मयूर कल्याणी व त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील इतर सहकारी तसेच अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनमधील काही डॉक्टर्स अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांतील होम क्वारंटाइन व आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांचे दैनंदिन अहवाल तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी नि:शुल्क सेवा देणार आहेत. होम आयसोलेटेड …

Read More »

मानिवलीतील शेतकर्यांची पुलाअभावी परवड

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील शेतकर्‍यांची पुलाअभावी पंचाईत झाली आहे. गावातील शेतकर्‍यांची 80 टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने शेतकर्‍यांना शेतीकडे जाण्यासाठी तब्बल सात-आठ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. मानिवली गावातील शेतकर्‍यांची पोश्री नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात …

Read More »

रायगडात 535 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात तब्बल 535 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी (दि. 20) झाली. त्याचबरोबर 392 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 267, पेण 43, अलिबाग 41, माणगाव 38, रोहा व महाड प्रत्येकी 31, खालापूर 24, कर्जत 22, उरण 16, …

Read More »

शासकीय कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरानमध्ये कोविडचा प्रदुभाव रोखण्याकरिता नगरपालिकेने येथील शासकीय कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी घेऊन परिपूर्ण खबरदारी घेतली आहे. यामध्ये नगरपालिका कर्मचारी, पोलीस, महसूल विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो पर्यटक भेट देतात. मागील सहा महिन्यांपासून कोविडमुळे माथेरान लॉकडाऊन आहे, मात्र माथेरानबाहेरून येणार्‍या …

Read More »

तरुणांनी बनविली पर्यावरणपूरक मकर

माणगाव ः प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मकरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यापूर्वी त्यासाठी प्लास्टिक, थर्माकोल आदी वस्तूंचा वापर होत होता. त्यामुळे पर्यावरणाला या घटकांचा धोका होता. यावर उपाय म्हणून लॉकडाऊन काळात शहरी भागातून गावाकडे आलेल्या तरुणांनी टाकावूतून टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी मकर बनविली आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या पुठ्ठ्यांचा वापर करून आकर्षक नक्षीकाम …

Read More »

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन; भंडारी बहुद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब पनवेलचा उपक्रम

अलिबाग ः प्रतिनिधी अगदी काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची घरोघरी लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. कोरोनाच्या काळातही भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी घरोघरी सजावट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारी बहुद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग व रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे रायगड जिल्ह्यामध्ये घरगुती गणेशोत्सव व सजावट स्पर्धेचे आयोजन …

Read More »