Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कामगारांच्या पाठीशी भाजप उभा राहणार : प्रवीण दरेकर

धाटावमधील एलपी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन   रोहे : प्रतिनिधीआमची भूमिका कारखाने बंद पाडण्याची नाही, परंतु कारखानदाराकडून स्थानिकांना न्याय मिळत नसेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर कारखानदारांना सांगावे लागेल की, हा कारखाना इथल्या लोकांसाठी आहे. ज्या ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय होत असेल त्या औद्योगिक क्षेत्रात भाजप कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, …

Read More »

‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’

मुरूड ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व शांततेत साजरा करून शांतता कमिटीच्या सदस्यांनी पोलिसांना विशेष सहकार्य करून गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मदत करावी, असे प्रतिपादन मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरूड पोलीस ठाण्यात शांतता सभा आयोजित करण्यात आली …

Read More »

भोरमाळ येथील मुलाला विषबाधा; समाजसेवकाचा मदतीचा हात

पेण ः प्रतिनिधी आपल्या वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या मुलास गवत मारण्याच्या विषारी औषधातून विषबाधा झाल्याची घटना पेण तालुक्यातील कामाली भोरमाळ आदिवासीवाडी येथे घडली आहे. तुकाराम कडू हे रविवारी (दि.16) सायंकाळी 4 वाजता आपल्या शेतावर गवत मारण्याचे औषध फवारणीसाठी गेले होते. आपल्यासोबत ते आपल्या अथर्व कडू या मुलालाही घेऊन गेले, …

Read More »

नवविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कळंब गावातील गृहिणी असलेली 22 वर्षीय महिला 13 ऑगस्ट रोजी सकाळी पोश्री नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता वाहून गेली होती. या विवाहित महिलेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला असून पतीचे अन्य महिलेबरोबर असलेले संबंध व सतत होणार्‍या मारहाणीमुळे करुणा सचिन बदे यांनी पोश्री नदीत उडी मारून …

Read More »

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त भाऊ सिनकर यांचा सत्कार

अलिबाग ः प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रायगड फोटोग्राफर अ‍ॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स अ‍ॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार आणि छायाचित्रकार भाऊ सिनकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रायगड फोटोग्राफर अ‍ॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर …

Read More »

लठ्ठपणावर करा मात

आरोग्य प्रहर लठ्ठपणावर मात करण्यासाठी धावणे, चालणे, व्यायाम करणे असे शारीरिक व्यायाम केले जातात, मात्र लठ्ठपणासाठी मानसिकताही कारणीभूत असते. त्यामुळे शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक स्वास्थ्य सुधारणार्‍या उपचारांची मदत घेतली तर लठ्ठपणावर मात करता येते. विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. नैराश्यग्रस्त रुग्ण खूप कमी खातात व वजन कमी …

Read More »

विद्यार्थ्यांची शासकीय दाखल्यांसाठी परवड

तहसील कार्यालयात पालकांची गर्दी कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे शासकीय दाखले देणारे कर्जत तहसील कार्यालयातील सेतू केंद्र तीन महिने बंद होते, मात्र आधी पालकांनी आपल्या पाल्याचे दिलेले नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला यांची पूर्तताही झालेली नाही. दरम्यान, तहसील कार्यालयातून दाखले प्रांताधिकारी कार्यालयात गेले असल्याचे तहसील कार्यालयातील कर्मचारी सांगत आहेत. लॉकडाऊन असल्याने कर्जत …

Read More »

गणेशोत्सवासाठी रायगड होतोय सज्ज; एक लाख 526 गणेशमूर्तींची यंदा प्रतिष्ठापना

अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी घरोघरी सुरू झाली आहे. सर्व अटी-नियमांचे पालन करून बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज होत आहेत.गणेशोत्सवाला येत्या शनिवार (दि. 22)पासून सुरुवात होत आहे. रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात यंदा 287 सार्वजनिक, तर एक लाख 239 घरगुती अशा एकूण एक लाख …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघात; चालकासह दोघांचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्याजवळ पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेलरला दुधाच्या टँकरने दिलेल्या धडकेत टँकरचालकासह दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 18) दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर उभा असलेल्या ट्रेलर (आरजे 02-जेबी 2043)चे पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना पाठीमागून भरधाव …

Read More »

वादळग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा; भाजपचे निवेदन

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदतीचे तातडीने वाटप करा, अशी मागणी अलिबाग तालुका भारतीय जनता पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले. भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 18) अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन चर्चा केली व निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. भाजप …

Read More »