पेण ः प्रतिनिधी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड केली. अॅड. मंगेश नेने विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात. ही निवड उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे स्वाक्षरी केलेल्या अहवालानुसार रायगड जिल्हा शांतता समितीच्या अशासकीय सदस्यपदी …
Read More »‘वावेदिवाळी-महागाव रस्ता गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करा’
माणगाव ः प्रतिनिधी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून या सणाला मुंबईहून अनेक चाकरमानी आपल्या गावांकडे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच गणरायाला आनंदाने घरी आणण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी माणगाव तालुक्यातील वावेदिवाळी-महागाव रस्त्यावरील तसेच दक्षिण रायगडातील अनेक गावांतून पडलेले रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, …
Read More »सर्वांनी नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा ः पो. नि. घुटुकडे
नागोठणे ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतरा हजारांवर गेली आहे. कोठेही धोका निर्माण न करता या पार्श्वभूमीवर सर्वांना या वर्षी गणेशोत्सव साजरा करावयाचा असून महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले आहे. शनिवारी (दि. 8) सकाळी …
Read More »जनावरांच्या गोठ्याला आग; गाय आणि वासरू बचावले
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डिकसळ गावातील एका शेतकर्याच्या गुरांच्या गोठ्यास शुक्रवारी सकाळी आग लागली. अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात असलेल्या गाय आणि वासरू यांना कोणतीही दुखापत न होता वाचविण्यात यश आले. शेतकरी तेथे दूध काढण्यासाठी गेल्याने धावपळ करून जनावरांना बाहेर काढल्याने कोणालाही इजा झाली नाही. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावातील …
Read More »शासनाने शेतकर्यांना दिलासा द्यावा
आदिवासी ठाकूर सेवा मंडळाची मागणी कर्जत ः बातमीदार आदिवासी भागातील शेतकरी मागील पाच महिने रोजगारापासून वंचित आहेत. त्यात शेतीच्या बांधबंदिस्तीपासून सर्वच कामे पैशांअभावी अडकून पडली आहेत. त्यामुळे शासनाने आदिवासी शेतकर्यांच्या जमिनीमधील शेतीबाबतची सर्व कामे शासनाच्या रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आदिवासी ठाकूर सेवा …
Read More »औषधांबाबत घ्यावी दक्षता
आरोग्य प्रहर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे आणि आजारांमधील प्रक्रिया व औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात. त्याचा …
Read More »कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांची कमतरता
राज्य शासनाचेदुर्लक्ष खोपोली : प्रतिनिधी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने स्थानिक स्तरावर उपचार आणि अलगीकरण करण्यासाठी खोपोली नगरपालिकेकडून दोन ठिकाणी 40 व 20 बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली, मात्र या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टरांची पूर्तता व्हावी म्हणून नगरपालिकेकडून जिल्हाधिकारी, पालकमंत्री, …
Read More »कंत्राटदारांचे अस्तित्व धोक्यात आणणार्या राज्य शासनाच्या आदेशाच होळी
पाली : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाने 30 जुलै रोजी कंत्राटदारांचे अस्तित्व धोक्यात आणणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या आदेशाला राज्यभरातून कडाडून विरोध होत असताना रायगड व कोकणात देखील कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने देखील याविरोधात एल्गार करण्यात आला. राज्यातील सर्व कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था यांच्या वतीने …
Read More »रायगडात 430 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 430 कोरोना रुग्णांची शुक्रवारी (दि. 7) भर पडली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 326 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 186, ग्रामीण 31) तालुक्यात 217, पेण 48, रोहा 42, खालापूर 29, अलिबाग 21, माणगाव व सुधागड प्रत्येकी 14, महाड 12, मुरूड …
Read More »तीन दिवसांनंतर रायगडात सूर्यदर्शन
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढल्यानंतर वरुणराजाने शुक्रवारी (दि. 7) पावसाने विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्याने सकाळी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी रायगडकरांना दिलासादेखील मिळाला आहे. जुलैपर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या 50 टक्के पाऊस …
Read More »